आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर बालरंगभूमी परिषद, बीड आणि सो.के.एस.के. महाविद्यालय (संगीत विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने एका भक्तीमय आणि रंग

आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर बालरंगभूमी परिषद, बीड आणि सो.के.एस.के. महाविद्यालय (संगीत विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने एका भक्तीमय आणि रंगतदार अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच महाविद्यालयाच्या सभागृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन नवगण शिक्षण संस्थेच्या सहसचिव डॉ. दीपाताई क्षीरसागर , श्री. भरत आण्णा लोळगे यांच्या हस्ते करण्यात आले. वारकरी संप्रदायाचा वारसा आणि संतवाङ्मयातील माधुर्य रसिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संगीत विभागातील होतकरू विद्यार्थी आणि स्थानिक कलाकारांनी सादर केले संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संत जनाबाई यांच्या प्रसिद्ध अभंगांनी संपूर्ण वातावरण विठूमय होऊन गेले. टाळ-मृदंगाच्या तालावर आणि स्वरमयी सादरीकरणाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. अभंगांच्या सुरेल सुरावटींनी उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. यावेळी बालकलाकार गायक वेदांत काजळे याने का गा रुसलासी, जान्हवी देशपांडे हिने सुंदर ते ध्यान, सिध्दी पाटील हिने अवघे गरजे पंढरपुर भक्ती जायभाय विठ्ठल आवडी सुरंजन जायभाय याने हेची दान देगा देवा , दुर्गा लोळगे रुप पाहता लोचणी श्रृष्टी राऊत हिने यशोदेचा हरी तर स्वराली तळेकर, भारती सानप, मयुरी साळुंके, भारती सानप, साहस जाजू, श्रेयश उगले, पार्थ घुंगरक, पृथ्वीराज पाटील, वासुदेव काजळे, तुकाराम जाधव, श्रावणी पाटोदकर, भरत अण्णा लोळगे यांनी विविध अभंग सादरीकरण केले. याप्रसंगी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळानकर, उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. खान ए. एस., कमवि उपप्राचार्य डॉ. नारायण काकडे, पर्यवेक्षक प्रा. जालिंदर कोळेकर, संगीत विभाग प्रमुख डॉ. महेश दाडगे, प्रा. सुरेश थोरात, प्रा. प्रियंका देशमाने, प्रा. इंद्रजित भांगे, श्री. नामदेव साळुंके, श्रीमती अनुराधा चिंचोलकर, श्री. प्रकाश मानुरकर, श्री. मिलींद शिवणीकर, तबला वादक श्री नरहरी दळे, श्री विकास जायभाये, हार्मोनियम वादक वासुदेव काजळे, सुरंजन जायभाय व प्राध्यापक, संगीतप्रेमी नागरिक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांनी कलाकारांच्या सादरीकरणास भरभरून दाद दिली. अशा उपक्रमांमुळे तरुणांमध्ये सांस्कृतिक मूल्ये आणि वारकरी परंपरेची गोडी निर्माण होण्यास मदत होते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी सुत्रसंचालन व आभार डॉ. महेश दाडगे यांनी मानले.

COMMENTS