Homeताज्या बातम्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत अनंत भीमराव गोरेमाळी यांची ड्रग इन्स्पेक्टर पदी निवड

केज तालुक्यातील बनसारोळा गावचे सुपुत्र अनंत भीमराव गोरेमाळी यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र  लोकसेवा आयोग मार्फत ड्रग इन्स्पेक्टर पदावर

सासऱ्याच्या प्रेमात पडलेली पत्नी मुलांना टाकून फरार l LOKNews24
वसंत रांधवण यांना निर्भिड पत्रकार पुरस्कार जाहीर
शेतकर्‍यांना पीककर्ज देताना बँकांनी हात आखडता घेऊ नये



केज तालुक्यातील बनसारोळा गावचे सुपुत्र अनंत भीमराव गोरेमाळी यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र  लोकसेवा आयोग मार्फत ड्रग इन्स्पेक्टर पदावर निवड झाल्याने गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनंत गोरेमाळी यांनी जिद्द, कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातून उच्च पदावर निवड होणे ही बनसारोळा गावासाठी अभिमानाची बाब मानली जात असून त्यांच्या यशामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गावातील ग्रामस्थ, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शासकीय सेवेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अनंत गोरेमाळी यांच्या निवडीमुळे बनसारोळा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या यशाचा संपूर्ण केज तालुक्याला अभिमान वाटत आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळे ग्रामीण भागातील युवकांनी स्पर्धा परीक्षांकडे आत्मविश्वासाने वाटचाल करावी, असा संदेशही या यशातून मिळत आहे.

COMMENTS