बीड : दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणार्या युवा आंदोलकांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध सामा

बीड : दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणार्या युवा आंदोलकांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध सामाजिक, शेतकरी व कामगार संघटनांनी तीव्र निदर्शने केली. या आंदोलनाचे नेतृत्व प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी केले.
नीट पेपरफुट प्रकरणात केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत, अभिजीत दिपके आणि पर्यावरणवादी नेते सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला मोठ्या प्रमाणावर युवकांचा पाठिंबा मिळत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर, पाण्याचे फवारे आणि लाठीचार्ज केल्याचा आरोप करत त्याचा निषेध करण्यात आला. यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा तसेच आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनात किसान संघर्ष समिती, जनहित अभियान, ओबीसी संघर्ष समिती, राष्ट्रीय समाज पक्ष, युवक क्रांती दल, हमाल-मापाडी संघटना तसेच विविध कामगार संघटनांचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. याप्रसंगी प्रा. सुशीलाताई मोराळे, अमर शेख, पंडित तुपे, संगमेश्वर आंधळकर, शेरजमा पठाण, प्रा. अण्णासाहेब मतकर, अंकुश खाडे, बबन आंधळे, कॉ. इकबाल पेंटर, माजी आमदार भाई जनार्दन तुपे, बबन वडमारे, डॉ. संजय तांदळे, सुभाष लोणके, मधुकर केदार, बाजीराव ढाकणे, भाई अ.भ. लोंढे, संतराम घोडके पाटील, डॉ. डी. जी. तांदळे, वजीर शेख, बाळासाहेब पवळ, देविदास चव्हाण, शेख शफिक भाई, मौलाना आझाद विचार मंचचे रिजवान पठाण, सुग्रीव केदार, राजेंद्र सानप, मीनाक्षी देवकते, ज्योती वडमारे, विद्या राठोड, शारदा अडागळे, राजेंद्र दराडे, अनंत सारूक यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS