Homeताज्या बातम्या

बीडच्या सुश्रुत हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी मोफत मूळव्याध तपासणी शिबीर; महिला रुग्णांसाठी महिला डॉक्टरांची स्वतंत्र टीम

बीड: शहरातील सुश्रुत मूळव्याध व भगंदर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने शुक्रवार, दिनांक २४ जुलै रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत मोफत मूळव्याध, भगंद

Karamala : बलात्काऱ्याला फाशीच्या शिक्षेची केली मागणी (Video)
शेअर बाजार तेजीनंतर कोसळला
अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

बीड: शहरातील सुश्रुत मूळव्याध व भगंदर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने शुक्रवार, दिनांक २४ जुलै रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत मोफत मूळव्याध, भगंदर आणि फिशर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर प्रख्यात मूळव्याध तज्ज्ञ डॉ. अमोल खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ’द्वारकानंद हॉस्पिटल शेजारी, प्रदीप गॅस ऑफिस समोर, राऊत मळा, माळीवेस रोड, बीड’ येथील सुश्रुत मूळव्याध व भगंदर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे होणार आहे.

अनेकदा महिला रुग्ण संकोच किंवा भीतीपोटी या आजारांची लक्षणे लपवून ठेवतात. हीच बाब लक्षात घेऊन, शिबिरात महिला रुग्णांची तपासणी महिला मूळव्याध तज्ज्ञ डॉ. शिल्पा खेत्रे व त्यांच्या टीममार्फत केली जाणार आहे, जेणेकरून महिलांना न संकोचता तपासणी व उपचार करून घेता येतील.

याबाबत माहिती देताना डॉ. अमोल खेत्रे म्हणाले, “शौचाच्या वेळी रक्त पडणे, तीव्र वेदना होणे किंवा गाठ येणे ही मूळव्याधाची प्राथमिक लक्षणे आहेत. भीती किंवा लाजेपोटी याकडे दुर्लक्ष केल्यास आजार गंभीर रूप धारण करू शकतो. त्यामुळे रुग्णांनी वेळेत निदान करून घेतले तर हा आजार पूर्ण बरा होतो.”

अधिक माहितीसाठी किंवा नाव नोंदणीसाठी ८६००२८७९७२ किंवा ७५१७७४७९७२ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा थेट शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन सुश्रुत हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS