Homeताज्या बातम्या

चोरीचा माल खरेदी करणाऱ्यावर पोलिसांचा छापा १६३५ किलो तांब्याच्या तारा जप्त;  गुन्हा दाखल

जामखेड : शेतकऱ्यांच्या शेतीपंपांसह विविध ठिकाणांहून चोरी झालेल्या तांब्याच्या तारांची खरेदी केल्याच्या संशयावरून जामखेड पोलिसांनी शहरातील एका स्टील व भांड्याच्या दुकानावर छापा टाकून तब्बल १ हजार ६३५ किलो वजनाच्या तांब्याच्या सोललेल्या तारा जप्त केल्या. या प्रकरणी दुकान मालकाविरुद्ध   गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींकडे  माल ताब्यात बाळगण्याबाबत विचारणा केली असता आरोपी याने कोणतेही कागदपत्रे सादर केले नाहीत तसेच सदर मालाबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा सदर तांब्याच्या तारा या चोरीच्या असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीसांनी महाराष्ट्रपोलीस  गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपनेश्वर रोडवरील साई समर्थ स्टील व भांडी दुकानाचे मालक महेश मोहनलाल भंडारी (वय ४८) यांच्या दुकानात चोरीचा तांब्याचा माल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे आणि त्यांच्या पथकाने गुरुवारी (दि. १६) रात्री छापा टाकला.या कारवाईत दुकानातून ३९ गोण्यांमध्ये साठवून ठेवलेल्या सुमारे १ हजार ६३५ किलो वजनाच्या सोललेल्या तांब्याच्या तारा आढळून आल्या. या तारांची अंदाजे किंमत ९ लाख ७९ हजार २०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त करण्यात आलेल्या तारा शेतीपंपांमध्ये वापरल्या जाणाऱ्या असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.या मालाबाबत विचारणा केली असता महेश भंडारी यांना मालाची खरेदी किंवा मालकी सिद्ध करणारी कोणतीही कागदपत्रे सादर करता आली नाहीत. तसेच त्यांनी समाधानकारक माहिती न दिल्याने हा माल चोरीचा असल्याचा संशय पोलिसांना आला.याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कुलदीप घोळवे यांच्या फिर्यादीवरून महेश भंडारी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे करीत आहेत.

शब्बीर जिवंत परतला..! ‘तो’ मृतदेह उकरून ओळख पटविण्याचा प्रयत्न
चहाच्या पॅकेटवर उत्पादन दिनांकच नाहीश्रीगोंद्यात  ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मनमाड महामार्गावर एका भीषण अपघाताने तरुणाचा बळी 

COMMENTS