Homeताज्या बातम्या

नायगाव तालुक्यातील पाच महसूल मंडळांत दमदार भिज पाऊसकरपून जाणार्‍या पिकांना जीवदान शेतकर्‍यात समाधानाचे वातावरण निर्माण

नायगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिके करपण्याच्या मार्गावर होती. विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर, मूग,

24 कोटींच्या ’माता व बाल’ रुग्णालयात अवघ्या 10 दिवसांतच वॉटर फिल्टर बंद!गळती, लिफ्ट बिघाडानंतर आता पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न; व्यवस्थेवर डॉ. गणेश ढवळे यांचा सवाल
भाजपवर लाईन आणि काँगे्रससोबत लग्न !अ‍ॅड. आंबेडकरांचा ठाकरे गटावर शेलक्या शब्दांत टीका
24 तासांत खुलासा करा, अन्यथा अपात्रतेची कारवाईठाकरे गटाचा सहा खासदारांना स्पष्टीकरण देण्याचा इशारा
खरीप हंगामातील पिके सोंगणीस सुरु वात Nashik Marathi News | The kharif season begins with sowing | Latest Nashik News at Lokmat.com



नायगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिके करपण्याच्या मार्गावर होती. विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यांसारख्या पिकांना पाण्याअभावी मोठा फटका बसत होता. त्यामुळे शेतकरी चिंतेत असतानाच शनिवारी व  रविवारी तालुक्यातील पाच महसूल मंडळांत दमदार भिज पाऊस झाल्याने करपून जाणार्‍या पिकांना मोठे जीवदान मिळाले आहे. या पावसामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या आठ-दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला होता. अनेक ठिकाणी पिकांची पाने पिवळी पडू लागली होती, वाढ खुंटली होती आणि काही भागात पिके वाळण्याची भीती निर्माण झाली होती. शनिवारी रात्रभर झालेल्या दमदार पावसामुळे शेतजमिनीत पुन्हा ओलावा निर्माण झाला असून खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तालुक्यातील विविध भागांत झालेल्या या पावसामुळे शेतकर्‍यांनीही समाधान व्यक्त केले आहे. वेळेत झालेल्या या पावसामुळे खतांचा उपयोग होणार असून पिकांच्या वाढीस गती मिळेल, असा विश्वास शेती क्षेत्रातील जाणकार शेतकर्‍यांनी व्यक्त केला आहे. केवळ एका पावसावर समाधान मानून चालणार नसून खरीप हंगाम चांगला यशस्वी होण्यासाठी पुढील काळातही नियमित आणि समाधानकारक पावसाची आवश्यकता असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. पुढील काही दिवसांतही पाऊस कायम राहिल्यास यंदाच्या खरीप हंगामाचे उत्पादनात वाढ होण्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.
पाच महसूल मंडळांना दिलासा
कुंटूर, नायगाव, नरसी, मांजरम,बरबडा या पाचही महसूल मंडळांत दमदार भिज पावसामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला असून करपण्याच्या मार्गावर असलेल्या सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद पिकांना जीवदान मिळाले आहे. तर शेतजमिनीत पुन्हा ओलावा निर्माण झाल्याने खतांचा प्रभाव वाढून पिकांच्या वाढीस मदत होणार असल्याने शेतकर्‍यांत आनंदाचे वातावरण असले तरी चांगल्या उत्पादनासाठी पुढील नियमित पावसाची गरज आहे.

COMMENTS