Homeताज्या बातम्या

अयोध्या राम मंदिर देणगी प्रकरणी काँग्रेसचा पाटोदा येथे ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रहश्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांवर कारवाईची मागणी; पोलीस ठाण्यात दिले निवेदन

अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या देणगी व्यवस्थापनात कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाच्या वतीने पाटोदा शहरातील संगमेश्वर मंदिर परि

पाटबंधारे विभागाच्या मुख्य प्रवेशद्वारातच चहाचे दुकान; प्रशासनाच्या भूमिकेवर संशयअतिक्रमण हटविल्यानंतर शासकीय आवारात व्यवसाय सुरू; कार्यकारी अभियंता एस. एन. पवार यानी शासकीय जागा किरायाने दिली काय?
प्रमिलादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयात पदवीदान समारंभ व माजी विद्यार्थी-पालक मेळावा उत्साहात
मृदा, जल आणि वृक्ष संवर्धन केले तरच भविष्य उज्ज्वल – जलनायक मयंक गांधीसरस्वती नदी पुनरुज्जीवन कामाचा शुभारंभ; हजारोंच्या उपस्थितीत संवाद मेळावा संपन्न



अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या देणगी व्यवस्थापनात कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाच्या वतीने पाटोदा शहरातील संगमेश्वर मंदिर परिसरात शुक्रवारी (दि. 10) ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. सत्याग्रहानंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी करणारे निवेदन पाटोदा पोलीस ठाण्यात सादर करण्यात आले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार राज्यभर 9 ते 14 जुलैदरम्यान हे आंदोलन राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाटोदा येथे सकाळी 11 वाजता संगमेश्वर मंदिरात सत्याग्रह करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी ‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन, ‘खरा तो एकची धर्म’ तसेच ‘पसायदान’ सादर करून आंदोलन केले. या सत्याग्रहात पक्षाचे झेंडे न वापरता काँग्रेसचे दुपट्टे व पांढर्‍या टोप्या परिधान करण्यात आल्या होत्या. काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, रामभक्त तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काँग्रेसच्या वतीने श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या देणगी व्यवस्थापनात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सत्याग्रहानंतर पाटोदा पोलीस ठाण्यात श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे सहसचिव चंपत राय, ट्रस्टी अनिल मिश्रा आणि कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष राहुल जाधव, ज्येष्ठ शेतकरी नेते राजाभाऊ देशमुख, माजी सैनिक शहाजी नाईकनवरे, सुनीलदादा जाधव, राहुल नागरगोजे, तानाजी जाधव, माणिक जाधव, दिलीप वाघमारे, नामदेव गाडेकर, बाबू देशमुख, शंकर घाडगे, बापू गायकवाड, शरद राऊत, गणेश जाधव, संजय नागरे, शिवाजी जाधव यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

COMMENTS