Homeताज्या बातम्या

विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

    शेवगाव :  पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथील शेतकरी ज्ञानदेव रावसाहेब डमाळे (वय ३५) यांचा शेतात पेरणीचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना दि. ९ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान घडली.मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानदेव डमाळे हे शेतात पेरणीचे काम करत असताना विजेच्या प्रवाहाच्या संपर्कात आले. त्यांना जोरदार विद्युत धक्का बसल्याने ते गंभीर जखमी झाले. आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला; मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.या घटनेमुळे डमाळवाडी परिसरात शोककळा पसरली असून, डमाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती ज्ञानदेव डमाळे (वय 31), मुलगी आर्या ज्ञानदेव डमाळे (वय १३), मुलगा आशीष ज्ञानदेव डमाळे (वय ११), वडील रावसाहेब डमाळे (वय ६२), आई गोदाबाई रावसाहेब डमाळे (वय ५७), भाऊ बाबासाहेब डमाळे (वय ३९ ) तसेच इतर नातेवाईक असा परिवार आहे.या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतात काम करताना विद्युत सुरक्षिततेबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. तसेच डमाळे कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

फसव्या कर्जमाफी आदेशाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळीबहुसंख्य शेतकरी राहणार वंचित असल्याचा आरोप
कर्जमाफीच्या अटीशर्ती रद्द कराअकोलेत किसान सभेची निदर्शने
महागाईवरून काँगे्रसचा आक्रमक पवित्रा

COMMENTS