https://youtu.be/3Ec5eMZOVFI डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलमधून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. नवजात बालकासाठी एनआयसीयू
डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलमधून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. नवजात बालकासाठी एनआयसीयू बेड उपलब्ध नसल्याच्या कारणावरून शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी महिला डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. एका महिलेच्या सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर तिच्या नवजात बाळाला एनआयसीयू बेडची गरज होती, मात्र हॉस्पिटलमध्ये बेड खाली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याच कारणावरून रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट डॉक्टरांशी वाद घालत त्यांच्यावर हात उठवला. या संपूर्ण मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून, त्यामध्ये म्हात्रे आणि त्यांचे कार्यकर्ते डॉक्टर आणि नर्सेसना ढकलत मारहाण करताना स्पष्ट दिसत आहेत. या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी आपली नियमित वैद्यकीय सेवा बंद ठेवून तीव्र निदर्शनं केली. याप्रकरणी विष्णू नगर पोलिस ठाण्यात नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या या हल्ल्यामुळे महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रात तीव्र नाराजी पसरली असून, नागरिकांमधून म्हात्रे यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

COMMENTS