बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) परळी शहरच्या वतीने विविध धार

बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) परळी शहरच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. खासदार सोनवणे यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि निरोगी आयुष्य लाभावे, या सदिच्छेने आयोजित कार्यक्रमातून सर्वधर्मसमभाव, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात पंचज्योतिर्लिंग श्री प्रभू वैद्यनाथ मंदिरात महाअभिषेक व विशेष पूजनाने झाली. तालुकाध्यक्ष बाबासाहेब शिंदे पाटील, शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रभू वैद्यनाथाच्या चरणी खासदार बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि यशस्वी सार्वजनिक जीवनासाठी प्रार्थना केली. त्यानंतर मलिकपुरा येथील हजरत दावल मलिक शाह दर्ग्यात जाऊन दर्गा शरीफवर पवित्र चादर अर्पण करण्यात आली. यावेळी देशात शांतता, बंधुभाव आणि खासदार सोनवणे यांच्या उत्तम आरोग्यासाठी मनोभावे दुवा मागण्यात आला. धार्मिक उपक्रमानंतर दर्गा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) ज्येष्ठ नेते ड. जीवनराव देशमुख, तालुकाध्यक्ष बाबासाहेब शिंदे पाटील, शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील, कार्याध्यक्ष बदरभाई, शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष हनुमंत फड, शहर उपाध्यक्ष बाबा शेख, शहर संघटक सद्दाम शेख, श्रीनिवास राऊत, अध्यात्म विकास आघाडी शहराध्यक्ष मोहन मुंडे, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष संग्राम देशमुख, तसेच रमेश गायकवाड, अरुण सपाटे, सोहेल पठाण, गणेश सोळंके, लखन मोरे, चंद्रकांत पठाडे, स्वप्नील पतंगे, गुलाब पिलवटे, ऋषी नावेकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमांमुळे परळी शहरातील सर्वधर्मसमभावाची परंपरा अधिक बळकट झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सामाजिक ऐक्य, पर्यावरण संरक्षण आणि जनसेवेचा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात या उपक्रमांना यश आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

COMMENTS