Homeताज्या बातम्या

एसआयआर प्रक्रियेत एकही पात्र मतदार वंचित राहणार नाहीमाध्यमांनी जनजागृतीत पुढाकार घ्यावा-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) 2026 अंतर्गत जिल्ह्यात 30 जूनपासून बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या माध्यमातून गणनापत्रके भरण्याची प्रक्रिया सुरू

अचूक मतदार यादी हाच लोकशाहीचा पायाजिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे नांदेडकरांना विशेष आवाहन
गोपाळचावडी व बाबुळगाव ग्रामपंचायतींचे वार्ड आरक्षण जाहीर
गोपाळचावडी व बाबुळगाव ग्रामपंचायतींचे वार्ड आरक्षण जाहीर; १७ जून रोजी हरकतींसाठी विशेष बैठक



विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) 2026 अंतर्गत जिल्ह्यात 30 जूनपासून बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या माध्यमातून गणनापत्रके भरण्याची प्रक्रिया सुरू असून ती विहित मुदतीत पूर्ण केली जाईल. या प्रक्रियेत एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. तसेच या मोहिमेबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी माध्यमांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी राजकुमार माने व विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले की, सर्व पात्र मतदारांनी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून घरोघरी पडताळणीसाठी येणार्‍या बीएलओंना आवश्यक माहिती द्यावी. जिल्ह्यात मोहिमेला वेग आला असून नागरिकांच्या सहकार्यामुळे ती अधिक प्रभावीपणे पूर्ण होईल. या मोहिमेसाठी जिल्ह्यात 3 हजार 88 बीएलओ, 310 बीएलओ पर्यवेक्षक, 90 सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि 9 मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार अतिरिक्त बीएलओंचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय व राज्य मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी 10 हजार 909 बूथस्तरीय एजंट (बीएलए) नियुक्त केले आहेत. गणनापत्रकाचे मॅपिंग किंवा डिजिटायझेशन करताना तांत्रिक अडचणी आल्यास मतदारांनी घाबरून न जाता संबंधित बीएलओशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. 2002 च्या विशेष सखोल पुनरिक्षणात समाविष्ट असलेल्या मतदारांनी केवळ माहितीची पडताळणी करून गणनापत्रक सादर करायचे आहे. तसेच पात्र मतदारांसाठी ऑनलाइन गणनापत्रक भरण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत एसआयआर मोहिमेच्या प्रभावी जनजागृतीवर भर देण्यात आला. मतदार यादी शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत पात्र मतदारांची नावे कायम ठेवली जातील, तर मृत, दुबार अथवा स्थलांतरित मतदारांची नावे नियमानुसार वगळली जातील, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले. तसेच डिजिटायझेशन प्रक्रियेदरम्यान उद्भवणार्‍या तांत्रिक अडचणी बीएलओमार्फत तातडीने दूर करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

COMMENTS