शहरटाकळी : विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, शिस्त आणि पालकांप्रती असलेली जबाबदारी यांची जाणीव ठेवली, तर त्यांचे उज्ज्वल भविष्य निश्चित घडते, असे प्रतिपादन जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी कारभारी नजन यांनी केले.शेवगाव तालुक्यातील दहीगाव-ने येथील नवजीवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावीच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात ते बोलत होते.प्रास्ताविकात प्राचार्य रमेश खैरे यांनी कनिष्ठ महाविद्यालयातील शासकीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तीनही शाखांमध्ये क्षमतेनुसार प्रवेश पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांना विद्यालयातील नियम, शिस्त आणि शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.पर्यवेक्षक मच्छिंद्र पानकर यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत व्यक्तिमत्त्व विकासालाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात कारभारी नजन यांनी अभ्यासाचे महत्त्व विशद करताना विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन, नियमितता आणि शिस्त या गुणांच्या बळावर यश संपादन करावे, असे सांगितले. कार्यक्रमास उपप्राचार्य जयराम नांगरे, बाळासाहेब मंडलिक, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनीता ढगे यांनी केले. आभार मकरंद बारगुजे यांनी मानले.

COMMENTS