Homeताज्या बातम्या

ठाकरे सेनेच्या पदाधिकार्‍यांना पोलिसांच्या नोटिसाखासदारांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर हालचाली

नांदेड रेल्वे विभागात उद्या होणार्‍या खासदारांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या काही पदाधिकार्‍यांना पोलिसां

पर्यावरणदिनानिमित्त ठाकरे सेनेकडून तुळशी रोपांचे वाटप    
24 तासांत खुलासा करा, अन्यथा अपात्रतेची कारवाईठाकरे गटाचा सहा खासदारांना स्पष्टीकरण देण्याचा इशारा
सरसकट कर्जमाफीसाठी ठाकरे सेनेचे आंदोलन
सहा खासदारांना ठाकरे गटाची नोटीस



नांदेड रेल्वे विभागात उद्या होणार्‍या खासदारांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या काही पदाधिकार्‍यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.
मुख्य महानगर प्रमुख प्रकाश मारावार, उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे, नवज्योतसिंग गाडीवाले, युवा सेनेचे सचिन पाटील यांच्यासह काही पदाधिकार्‍यांना संबंधित पोलीस ठाण्यात बोलावून नोटिसा देण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी प्रकाश मारावार, विजय बगाटे, नवज्योतसिंग गाडीवाले आणि सचिन पाटील यांनी दावा केला की, खासदारांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर निष्ठावान शिवसैनिकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असून पोलिसांमार्फत विनाकारण नोटिसा बजावल्या जात आहेत. अशा कारवायांमुळे शिवसैनिकांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. जनता योग्य वेळी आपला कौल देईल, असा विश्वासही संबंधित पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला. दरम्यान, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांनी संबंधित पदाधिकार्‍यांना नोटिसा देऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांची अधिकृत भूमिका वृत्त लिहिपर्यंत प्राप्त होऊ शकली नव्हती.

COMMENTS