श्रीरामपूर : येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या ‘जीवन हे अनमोल’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन बेलापूर रोडवरील साईसुधा काळे रसवंती गृह लॉन्स व्यासपीठावर नुकतेच पार पडले.या कवितासंग्रहाचे महत्त्व सांगताना श्रीराम अबॅकस क्लासच्या संचालिका प्रा. पल्लवी नंदकुमार सैंदोरे म्हणाल्या, सृष्टीक्रमात मानवी जीवनाचे मूल्य अधिक आहे, हे सूत्र सांगणारे प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा *’जीवन हे अनमोल’* हा कवितासंग्रह जीवनपोषक असल्याचे मत व्यक्त केले.प्रारंभी डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी कवितासंग्रहाचा परिचय करून दिला.वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष सौ. मंदाकिनी उपाध्ये यांनी प्रा.पल्लवी सैंदोरे, जयश्री जोर्वेकर यांचा सत्कार केला. तर डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी पीएसआय मेजर नंदकुमार सैंदोरे, कचरू जोर्वेकर, शुभम जोर्वेकर यांचा सत्कार केला. यावेळी चंद्रकला सैंदोरे, मंडणबाई वंजारी, उषा भागवत, ताराताई सैंदोरे, माधुरी जोर्वेकर, मानसी सैंदोरे, अण्णासाहेब भागवत, नितीन जोर्वेकर, श्रीराम सैंदोरे, प्रथमेश जोर्वेकर,आराध्या सैंदोरे, धनश्री सैंदोरे आदी उपस्थित होते. दरम्यान पीएसआय मेजर नंदकुमार सैंदोरे म्हणाले, डॉ.बाबुराव उपाध्ये यांच्या सुमारे ६५ पुस्तकातून जगण्याचे अनुभव आणि जीवन चिंतनाचे शोधसंदर्भ आहेत. डॉ. उपाध्ये यांचा ‘जीवन हे अनमोल’ हा १४ वा कवितासंग्रह आहे.ग्रंथा वाचनालयात कवितासंग्रहाच्या परिसंवादात प्रा. पल्लवी सैंदोरे यांनी सांगितले की,आजच्या शिक्षणात संस्कारमूल्य रुजले पाहिजे, त्यासाठी असे कवितासंग्रह वाचले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. अण्णासाहेब भागवत, कचरू जोर्वेकर, शुभम जोर्वेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले तर माधुरी जोर्वेकर यांनी आभार मानले.

COMMENTS