https://youtu.be/DU7ruZf8MkA शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील शेवगाव शहरामध्ये एक इसम चारचाकी गाडीने दारुचे बॉक्स घेऊन जाणार असल्याची गोपनीय माहिती
शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील शेवगाव शहरामध्ये एक इसम चारचाकी गाडीने दारुचे बॉक्स घेऊन जाणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी तपास पथक तयार करुन गोपनीय माहितीप्रमाणे शेवगाव ते आखेगाव जाणारे रोडला मुंढे चौक शेवगाव येथे सापळा लावून चारचाकी वाहन अडवले असता सदर वाहनात विदेशी दारू आढळल्याने सदर इसमास ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव रामभाऊ तुळशीराम गुंजाळ दहिगाव ने त्याचेकडे दारु विक्रीचा परवाना असले बाबत चौकशी केली असता त्याचेकडे कोणताही दारु विक्रीचा परवाना नसल्याचे आढळुन आले ,
आरोपीकडून 24 हजार रुपये किमतीच्या टुबर्क कंपनीच्या 120 बाटल्या , 7 हजार 200 रुपये किमतीच्या किंगफिशर कंपनीच्या 36 बाटल्या , 4 लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची शिफ्ट डिजायर गाडी असा 4 लाख 31 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला ,
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन , अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे , उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन बोरसे सह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे .

COMMENTS