Homeताज्या बातम्या

नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; गुटखा व जुगारप्रकरणी 17 जणांवर 5 गुन्हे, 1.97 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलिसांनी विशेष मोहीम राबवत गुटखा विक्री व अवैध जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई केली

पाटोदा पोलिसांकडून 14.80 लाखांचा गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थ नष्ट
गेवराई पोलिसांची मोठी कारवाई; जुगार अड्ड्यावर छापा, 12 जण ताब्यात, 6.63 लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रदीर्घ अनुभवी विश्वंभर पलेवाड यांनी स्वीकारला भोकर पोलिस निरीक्षक पदभार; गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर कारवाईचे संकेत
चोरी गेलेले साहित्य सिडको ग्रामीण पोलिसांनी सन्मानपूर्वक केले परत -  Lokmanthan | लोकमंथन


नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलिसांनी विशेष मोहीम राबवत गुटखा विक्री व अवैध जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण 17 आरोपींविरुद्ध पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून 1 लाख 97 हजार 185 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
30 जून रोजी नांदेड ग्रामीण पोलिसांनी हद्दीत गस्त घालत असताना पानटपरीवर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पानमसाला विक्रीसाठी साठवून ठेवलेला आढळून आला. या प्रकरणी संबंधित विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करून सुमारे 1 लाख 28 हजार 585 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर कारवाई केली. या कारवाईत 16 जणांना ताब्यात घेण्यात आले असून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 68 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व नांदेड ग्रामीण पोलिसांच्या पथकाने केली. जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री, जुगार व इतर बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

COMMENTS