देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड येथे बुधवारी (दि. 1) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा ’हरित क

देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड येथे बुधवारी (दि. 1) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा ’हरित क्रांतीचे प्रणेते’ स्व. वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला इंजि.दीपंकर रोडे, प्रा.अर्जुन राठोड, प्राचार्य प्रा. डी. जी. निकाळजे यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS