Homeताज्या बातम्या

वसंतराव नाईकांनी राज्यात हरितक्रांती घडवली – राजेंद्र आमटेकृषी दिनी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने अभिवादन

सर्वसामान्य शेतकर्‍याच्या घरामध्ये जन्म घेणार्‍या वसंतराव नाईक साहेबांनी महाराष्ट्रात हरितक्रांती घडविण्याचे काम केले,  असे प्रतिपादन शेतकरी हक्क

वसंतराव नाईक हरितक्रांतीचे प्रणेते; त्यांच्या जयंतीनिमित्त कृषीदिन उत्साहात साजरा – डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड
काळे कुटुंबाकडून संपूर्ण तालुक्यावरच अन्याय : गोर्डे
देशात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध



सर्वसामान्य शेतकर्‍याच्या घरामध्ये जन्म घेणार्‍या वसंतराव नाईक साहेबांनी महाराष्ट्रात हरितक्रांती घडविण्याचे काम केले,  असे प्रतिपादन शेतकरी हक्क मोर्च्याचे राजेंद्र आमटे यांनी केले.
पुढे बोलताना आमटे म्हणाले की, पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचे काम वसंतराव नाईक यांनी केले. हरितक्रांतीचे नव्हे तर शेतक्रांती व सर्वसामान्य मजुरांकरिता रोजगार हमी योजना आणली. महाराष्ट्रात हरितक्रांती, श्वेतक्रांती, रोजगार हमी, पंचायतराज यांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सुखी करण्याचा प्रयत्न त्यांच्या काळात झाला. वसंतरावजी नाईक यांनी महाराष्ट्रामध्ये हरितक्रांती घडून आणली म्हणून च त्यांचा जन्मदिवस हा कृषी दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी शेतकरी हक्का मोर्चाचे शेतकरी पुत्र राजेंद्र आमटे, रामधन जमाले, हनुमान घोडके, डॉ.शेंडगे,  माऊली परसकर, दादा सपकाळ, कोठेकर बाबू, दिगंबर सपकाळ, दादा परसकर सह आदी उपस्थित होते.

COMMENTS