Homeताज्या बातम्या

सावकाराच्या जाचास कंटाळून तरुणाची आत्महत्या

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृताच्या नातेवाईकांनी खाजगी सावकाराच्या सततच्या त्रासामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला असून, या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे.देवळाली प्रवरा येथील गडाख वस्ती (खांदे वस्ती) येथील शुभम बाबासाहेब खांदे (वय २८) यांनी सकाळी राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मालकीचा डंपर खाजगी सावकाराने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पैसे भरा, अन्यथा तुमच्या नावावरील जमीन आमच्या नावावर करून द्या, असा सतत तगादा लावला जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शुभम खांदे यांना तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून आत्महत्येमागील कारणांचा तपास सुरू आहे.शुभम खांदे हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि तीन वर्षांची मुलगी असा परिवार आहे. एकुलत्या एक मुलाच्या निधनाने खांदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.दरम्यान, या प्रकरणात खाजगी सावकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत असून, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

जामखेडमध्ये ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे सामूहिक वाचन
संजीवनी इंजिनिअरिंगच्या १२ विद्यार्थ्यांंना नोकरी
अमृतवाहिनी बँकेचा1200 कोटींचा व्यवसायमाजी मंत्री थोरात ; ‘ बिजनेस समिट २०२६’ उत्साहात

COMMENTS