Homeताज्या बातम्या

शोल्डर- मलबार हिल शाखा अंतर्गत पश्‍चिम उपविभागातमेन – शासकीय बंगल्यांच्या कामांमध्ये कोट्यावधींचा घोटाळा; सार्वजनिक बांधकाम विभागातील शासकीय निधीची लूट; अधिकार्‍यांची संगनमताने मिलीभगत : डॉ. अशोक सोनवणे

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागातील मलबार हिल शाखा अंतर्गत पश्‍चिम उपविभागात पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचे साम्राज्य बोकाळले असून काही वरिष्ठ अधिकार्

समुपदेशनाद्वारे जिल्ह्यातील ८६ केंद्रप्रमुख पदांची नियुक्ती; प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण
तुलसी इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा! विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
लाडकी बहीण योजनेत १२ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ; अपात्र लाभार्थ्यांकडून १६५ कोटींच्या वसुलीची तयारी
मालाबार हिल: कैसे एक जंगल एक आलीशान घर में बदल गया


मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागातील मलबार हिल शाखा अंतर्गत पश्‍चिम उपविभागात पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचे साम्राज्य बोकाळले असून काही वरिष्ठ अधिकार्‍यांनी संगनमताने शासकीय बंगल्यांच्या एकाच कामांवर पुन्हा-पुन्हा खर्च काढून बिले काढतांना दिसून येत आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, सह्याद्री गेस्ट हाऊस, पुरातन बंगलो, अग्रदूत बंगलो, नंदवन बंगलो, सातपुडा बंगलो, चित्रकूट बंगलो, ज्ञानेश्‍वरी बंगलो, रॉयल स्टोन, तोरणा बंगलो, मुक्तागिरी बंगलो, वर्षा बंगलो, जेतवन बंगलो, वेस्ट सब डिव्हिजन, शिवनेरी बंगलो याठिकाणी एकच कामे पुन्हाःपुन्हा केल्याचे दाखवत कोट्यावधींचा घोटाळा काही अधिकार्‍यांनी घातला असून, त्यासंदर्भातील कामांची चौकशी करण्याची मागणी होत आहे. खरंतर या शासकीय बंगल्यांच्या दुरुस्ती व देखभाल कामांमध्ये गंभीर अनियमितता दिसून येत असूुुन सन 2019-20 व 2022-23 मध्ये करण्यात आलेली अनेक कामे पुन्हा त्याच स्वरूपात दाखवून खर्च मंजूर करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे हा पैसा अधिकार्‍यांनी हा कोट्यावधी रूपयांचा घोटाळा घातला आहे. या शासकीय बंगल्यांच्या कामांसाठी विशेषतः सागवान लाकूड बदलणे, फ्लोअरिंग बदलणे, एम.टी. रूफ दुरुस्ती किंवा बदलणे यांसारखी कामे वारंवार दाखविली जात आहेत. प्रत्यक्षात सागवान लाकडाचे आयुष्य 100 वर्षांपेक्षा अधिक असते, तर दर्जेदार फ्लोअरिंग व एम.टी. रूफ यांचे आयुष्यही अनेक दशके असते. असे असताना त्याच कामांवर पुन्हा पुन्हा खर्च दाखवून हा कोट्यावधी रूपयांचा घोटाळा घातला जात आहे. यातून शासकीय निधीचा अपव्यय होत असून, याप्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाने एक चौकशी समिती नेमून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. याप्रकरणात ज्या अधिकार्‍यांनी कामांची पाहणी केली, मोजमाप पुस्तिका ताब्यात घेऊन, पाहणी, चौकशी, काम प्रगतीपथावर असल्यासंदर्भातील तपासण्या कुणी केल्या, त्यांसदर्भातील बिले कुणी अदा केले, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून, संबंधित अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरतांना दिसून येत आहे.


अभियंता डावखर, पाथरवट, सगरे,
तापकिरे, घाटगे यांची संशयास्पद भूमिका

सार्वजनिक बांधकाम मलबार हिल अंतर्गत पश्‍चिम उपविभागातील निवृत्त उपअभियंता डावखर, शाखा अभियंता दिलीप पाथरवट, विद्यमान उपअभियंता सगरे तसेच शाखा अभियंता अनिकेत तापकिरे, घाटगे या अधिकार्‍यांनी सह्याद्री गेस्ट हाऊस, पुरातन बंगलो, अग्रदूत बंगलो, नंदवन बंगलो, सातपुडा बंगलो, चित्रकूट बंगलो, ज्ञानेश्‍वरी बंगलो, रॉयल स्टोनसह विविध शासकीय बंगलोच्या कामे वारंवार काढून कोट्यावधी रूपयांचा शासकीय मलिदा लाटल्याचे कागदपत्रांवरून दिसून येत आहे. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री, तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांनी तात्काळ दखल घेऊन चौकशी करून या अधिकार्‍यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.

COMMENTS