Homeताज्या बातम्या

के. एस. पी. विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा! विद्यार्थ्यांचे योगासन प्रात्यक्षिक

बीड: हरीचंद्र व्यायाम शाळा व क्रीडा मंडळ संचलित कर्मयोगिनी सावित्रीबाई फुले विद्यालय (के. एस. पी. विद्यालय), बीड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यं

आज २७ वी भव्य चालण्याची स्पर्धा; २८ जूनला रत्नेश्वरी पदयात्रा व बीजरोपण अभियान
अतिक्रमण हटाव मोहिमेला अडथळा करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा; बीड शहर बचाव मंचाची मागणी
जिल्हा न्यायालय बीड येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा! दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचे आवाहन

बीड: हरीचंद्र व्यायाम शाळा व क्रीडा मंडळ संचलित कर्मयोगिनी सावित्रीबाई फुले विद्यालय (के. एस. पी. विद्यालय), बीड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

योगासनांचे जीवनातील महत्त्व आणि प्रात्यक्षिके

याप्रसंगी शाळेतील योग शिक्षक श्री. विश्वनाथ गडकर यांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे मानवी जीवनातील महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगितले. दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी योगाचे महत्त्व पटवून देणे आणि त्याबाबत जनजागृती करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नियमित योगासने केल्याने शरीराची लवचिकता वाढते, स्नायू बळकट होतात आणि पचनक्रिया सुधारते. तसेच योग व प्राणायामामुळे ताणतणाव, नैराश्य कमी होऊन मन शांत राहते व एकाग्रता वाढण्यास मदत होते, अशी माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांनी विविध योगासनांची प्रभावी प्रात्यक्षिके सादर केली.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सौ. अंजलीताई शेळके, श्री. ऋषिकेशजी शेळके (अधीक्षक, वेतन पथक व भ.नि.नि. माध्यमिक, हिंगोली), शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. विशाल सुपेकर यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सक्रिय सहभागाने हा योग दिनाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

COMMENTS