तर मोदी सरकारही पाडलं जाऊ शकतं : अण्णा हजारेंचा इशारा

Homeताज्या बातम्याअहमदनगर

तर मोदी सरकारही पाडलं जाऊ शकतं : अण्णा हजारेंचा इशारा

राज्यातील लोकायुक्त कायदा सक्षम करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महाविकास आघाडी सरकारला तीन महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. जर कायदा अमंल

Sangamner : गणपती काळात मिरवणुकीवर बंदी
मुळा नदीवरील मानोरी केंदळ पुल पावसामुळे कोसळला
Pathardi : अतिवृष्टीने शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त | Lok News24

राज्यातील लोकायुक्त कायदा सक्षम करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महाविकास आघाडी सरकारला तीन महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. जर कायदा अमंलात आणला नाही तर, ठाकरे सरकार पडेल. लोकायुक्त कायदा अमंलात आणला नाही तर जानेवारीपासून आंदोलन करू, असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर आता त्यांनी केंद्र सरकारवर भाष्य केलं आहे.

देशातील कोणत्याही पक्षाच्या हाती उज्ज्वल भवितव्य नाही आहे. सगळे राजकीय नेते सत्ता आणि पैशांच्या मागे धावत आहेत. अशा स्थितीमध्ये जनसंसद मजबूत झाली पाहिजे. या माध्यामातून लोक जागे झाले तर, देशातील मोदी सरकारही पाडलं जाऊ शकतं, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

ब्रिटिशांच्या काळात बाहरेचे लोक देशाला लूटत होते. आता देशातीलच लोकच देशाला लुटत आहेत. देशातील सर्वच पक्षांचे लोक केवळ सत्ता आणि पैशात गुरफटून गेले आहेत. प्रत्येक सरकार स्वातंत्र्याचा अर्थ जर स्वैराचार असा घेऊन वागत असेल तर जनता बुलंद झाली पाहिजे आणि सरकारला पाडता आलं पाहिजे, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अण्णा हजारे देशपातळीवर संघटना बांधणीचे काम करताना दिसत आहेत. राळेगण सिद्धीमध्ये देशातील 14 राज्यांतून आलेल्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर पार पाडलं. देशातील विविध राज्यातून सुमारे 86 कार्यकर्त्यांनी शिबिरात सहभाग घेतला. या कार्यक्रमांमध्ये बोलताना अण्णा हजारे यांनी मोदी सरकारलाही इशारा दिला आहे.

COMMENTS