Homeताज्या बातम्या

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; कारेगव्हाण जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सवात सीईओ जितिन रहमान यांचे प्रतिपादन

बीड : बीड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कारेगव्हाण येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य 'प्रवेशोत्सव' कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य का

कर्जमाफी आणि पीकविमा प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे किसान सभेला आश्वासन
अशोक खरात यांच्या पत्नीचा जामीन अर्ज फेटाळला; उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा मोठा धक्का
१ ऑगस्टपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

बीड : बीड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कारेगव्हाण येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जितिन रहमान यांनी विशेष उपस्थिती लावली. याप्रसंगी शाळेत नव्याने दाखल झालेल्या २२ चिमुरड्या विद्यार्थ्यांचे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले.

सीईओ जितिन रहमान यांनी सर्व नवागत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन शाळेत स्वागत केले, तसेच विद्यार्थ्यांसोबत सेल्फी फोटो काढत त्यांचा आनंद द्विगुणित केला. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने मोफत गणवेश, दप्तर आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना सीईओ जितिन रहमान म्हणाले, “विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळा निर्माण होणे ही काळाची गरज आहे. कारेगव्हाण जिल्हा परिषद शाळेत सुरू असलेले शैक्षणिक व भौतिक विकासाचे काम संपूर्ण जिल्ह्यासाठी पथदर्शी असून, इतर शाळांनीही या शाळेचा आदर्श घ्यावा.”

कार्यक्रमानंतर सीईओ रहमान यांनी गावातील ऊसतोड कामगारांच्या स्थलांतरित कुटुंबांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. तसेच लोकसहभागातून शाळेने कात टाकल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमास समग्र शिक्षा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश बाहेगव्हाणकर, सरपंच राधाताई खंदारे, पोलीस पाटील अलका खंदारे यांच्यासह उपसरपंच, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS