Homeताज्या बातम्या

नांदेड जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सवाचा मोठा जल्लोष; मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शाळांना सदिच्छा भेटी

नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या शाळा प्रवेशोत्सव अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सोमवारी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात प्रव

मृत्यूशी झुंजणाऱ्या १५ वर्षे जुन्या वटवृक्षाचे श्रीगोंद्यात यशस्वी पुनर्रोपण; वृक्षप्रेमींचा स्तुत्य उपक्रम
रुढींना फाटा देत ‘देहदानाचा’ आदर्श! वडिलांचे पार्थिव वैद्यकीय शिक्षणासाठी दान; राहात्यातील गांधी कुटुंबाचा निर्णय
अहिल्यानगरमध्ये खळबळ; आरोग्य विभाग आणि एसबीआयमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची १२.७५ लाखांची फसवणूक

नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या शाळा प्रवेशोत्सव अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सोमवारी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नव्याने शाळेत पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांचे पुष्पगुच्छ, गुलाबपुष्प आणि शैक्षणिक साहित्य देऊन जंगी स्वागत करण्यात आले. जिल्हाभरातील विविध शाळांना वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देत विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला.

या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मेघना कावली यांनी जिल्हा परिषद हायस्कूल, विष्णूपुरी येथे भेट देऊन नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत गुणवत्तापूर्ण अध्ययनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमादरम्यान शाळेतील ‘आरोग्यदूत’ म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बॅच व आरोग्यदूत पुस्तिकांचे वितरण करण्यात आले, तसेच ‘राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती’ (NMMS) परीक्षेत यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. याप्रसंगी शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, प्राथमिक शिक्षणाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

दुसरीकडे, विभागाचे शिक्षण उपसंचालक दीपक चवणे यांनी अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पार्डी (म.) येथे सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले. यावेळी तालुका गटशिक्षणाधिकारी लोकदाजी गोडबोले, शिक्षण विस्तार अधिकारी निजाम शेख यांच्यासह शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकार्‍यांच्या विशेष संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेटी देऊन नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात आनंददायी आणि प्रेरणादायी झाली आहे.

COMMENTS