Homeताज्या बातम्या

अर्धापूरच्या पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; नगराध्यक्षा वैशाली देशमुख यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप

अर्धापूर : नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्याच दिवशी 'पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल, अर्धापूर' येथे नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत अत्यंत उत

किनवटमध्ये अजब प्रकार; भूमी अभिलेख कार्यालयाची इमारत रातोरात भुईसपाट, कोट्यवधींचा शासकीय भूखंड हडप करण्याचा डाव?
तामश्यात केवळ ‘तुकाराम मुंडे’ यांच्या नावाची अफवा; अन्‌ धास्तीने बंद झाली दुकाने व पानटपऱ्या!
किनवट तालुक्यातील दाभाडी येथील सिमेंट बंधाऱ्याच्या निकृष्ट कामाची ८ दिवसांत चौकशी करा; सरपंच अनिल डुडुळे यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आग्रही मागणी
अर्धापूर नगरपंचायत: आज चार जागांच्या सुधारीत आरक्षणाची सोडत | गोदातीर समाचार

अर्धापूर : नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्याच दिवशी ‘पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल, अर्धापूर’ येथे नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत अत्यंत उत्साहात करण्यात आले. अर्धापूर नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षा वैशालीताई देशमुख आणि इतर लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी नवीन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि पुष्पगुच्छ भेट देऊन त्यांचे शाळेत स्वागत केले.

याप्रसंगी नगराध्यक्षा वैशाली देशमुख, मुख्याधिकारी जगदीश दळवी, मुख्याध्यापक डॉ. एम. डब्ल्यू. शेख, महावितरणचे अभियंता पंकज देशमुख, तसेच राठोड, शेख साबेर, आझर काजी, कैलास देशमुख, शिक्षिका भालेराव यांच्यासह पालक, शिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत नियमित अभ्यास, शिस्त आणि सर्वांगीण विकासासाठी प्रेरित केले.

नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात अशा आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात झाल्याने पहिल्याच दिवशी विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शिक्षकांनी सर्व मान्यवर, पालक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.

COMMENTS