Homeताज्या बातम्या

तुकाराम मुंडेंचा धडाका! एफडीएच्या धाडसत्राने नांदेडमधील भेसळखोरांचे धाबे दणाणले; निकृष्ट मालाची गुपचूप विल्हेवाट सुरू

नांदेड : राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारताच सुरू केलेल्या धडाकेबाज कारवायांचे पडसाद आता नांदेड शहरासह

थकीत पीक विमा नुकसानभरपाई तात्काळ वितरित करा : आ. बोंढारकर यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी
शासकीय शाळांसमोर अस्तित्वाचे आव्हान! पहिलीच्या प्रवेशसंख्येत सलग घट; प्रत्येक बालक शाळेत आणण्यासाठी शिक्षण विभागाची व्यापक मोहीम
नांदेडसह हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के 4.7 रिश्टर तीव्रता, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
एफडीएचे धाडसत्र सुरूच;मुंबईतून एक कोटींचे भेसळयुक्त तेल जप्त

नांदेड : राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारताच सुरू केलेल्या धडाकेबाज कारवायांचे पडसाद आता नांदेड शहरासह ग्रामीण भागात उमटू लागले आहेत. वर्षानुवर्षे बिनधास्तपणे सुरू असलेल्या निकृष्ट खाद्यपदार्थांच्या व्यापाराला आणि नियम धाब्यावर बसवणार्‍या व्यावसायिकांना आता एफडीएच्या धाडसत्राची मोठी धास्ती बसली आहे. कारवाईच्या भीतीने जिल्ह्यातील अनेक व्यापार्‍यांनी आपल्या गोदामांमधील निकृष्ट व कालबाह्य (एक्सपायरी) मालाची गुपचूप विल्हेवाट लावण्यास सुरुवात केल्याची चर्चा रंगली आहे.

ग्रामीण भागातील हॉटेल व्यावसायिक, दुग्धजन्य पदार्थ विक्रेते, फास्ट फूड सेंटर चालक आणि प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांमध्ये सध्या घबराटीचे वातावरण आहे. एफडीएचे पथक अचानक दुकाने, गोदामे आणि हॉटेल्सवर धडक देऊन परवाने, उत्पादनाची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर तपासणी करत आहे. नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बनावट (अ‍ॅनालॉग) पनीरची विक्री होत असल्याच्या आणि चायनीज फूडमध्ये घातक रसायने वापरली जात असल्याच्या तक्रारींवरून आता थेट नमुने जप्त केले जात आहेत.

कारवाईच्या भीतीने अनेक व्यावसायिकांनी कागदपत्रे अद्ययावत करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे, तर काहींनी कारवाई टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी शहराबाहेर निकृष्ट माल फेकून पुरावे नष्ट करण्याचा सपाटा लावला आहे. सीमावर्ती भागातून येणाऱ्या अवैध गुटख्यावरही यंत्रणेने लक्ष केंद्रित केले आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या या आक्रमक मोहिमेचे नांदेडमधील सामान्य ग्राहकांमधून आणि ग्रामीण भागातून उत्स्फूर्त स्वागत होत असून, आरोग्याशी खेळणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई कायम ठेवावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

COMMENTS