Homeताज्या बातम्या

तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचा राज्यभर धसका; अफवेनेच बाजारपेठा ओस, अवैध विक्रेत्यांमध्ये खळबळ

मुंबई : राज्यातील कर्तव्यदक्ष आणि कठोर प्रशासनासाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदाची

सोनईत अन्न सुरक्षा विभाग व पोलिसांची मोठी कारवाई; ५३ हजारांचा बेकायदेशीर सुगंधी तंबाखूचा साठा जप्त
तामश्यात केवळ ‘तुकाराम मुंडे’ यांच्या नावाची अफवा; अन्‌ धास्तीने बंद झाली दुकाने व पानटपऱ्या!
शेगावच्या प्रसिद्ध कचोरी केंद्रावर एफडीएचा (FDA) छापा; कच्च्या मालाचे नमुने जप्त करून प्रयोगशाळेत पाठवले
IAS Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढे आयुक्त होताच ३ दिवसांत ५३ धाडी,  समर्थकांचा सवाल

मुंबई : राज्यातील कर्तव्यदक्ष आणि कठोर प्रशासनासाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यांनतर राज्यभरात अन्नसुरक्षा, भेसळ प्रतिबंध आणि अवैध व्यवसायांविरोधात कारवाईचा वेग वाढवला आहे. त्यांच्या या कठोर भूमिकेमुळे अनेक ठिकाणी व्यापारी आणि अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील मोठ्या बाजारपेठेत नुकतीच याची प्रचिती आली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी तपासणीसाठी येणार असल्याचा संदेश सोशल मीडियावर वेगाने पसरला. या संदेशानंतर व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. काही वेळातच किराणा दुकाने, मिठाई विक्रेते, पानटपऱ्या तसेच भोजनालयांनी आपली प्रतिष्ठाने बंद केली. संभाव्य तपासणी आणि कारवाईच्या भीतीमुळे अनेक व्यावसायिकांनी सावध भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही तपासणी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नियमांचे पालन न करणारे, निकृष्ट अथवा भेसळयुक्त वस्तूंची विक्री करणारे आणि बेकायदेशीर व्यवहार करणारे व्यापारी विशेषतः सतर्क झाले आहेत.

दरम्यान, बीड जिल्ह्यातील परळी परिसरातही अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे पथक कारवाईसाठी दाखल होणार असल्याची माहिती पसरताच अनेक पानटपरी चालकांनी आपले व्यवसाय तात्पुरते बंद केले. विशेषतः गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीशी संबंधित व्यावसायिकांमध्ये अधिक अस्वस्थता दिसून आली. राज्य शासनाने प्रतिबंधित पदार्थांची विक्री, भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि नियमबाह्य व्यवसायांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कठोर धोरण अवलंबले असून, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सक्रिय झाले आहे. परिणामी, तपासणीच्या केवळ चर्चेनेही अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण होत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

COMMENTS