Homeताज्या बातम्या

अकोले तालुक्यातील कोतुळ ग्रामीण रुग्णालयाचे ‘भौतिक आरोग्य’ धोक्यात; मूलभूत सुविधांच्या अभावामुळे रुग्ण आणि कर्मचारी त्रस्त

अकोले : चाळीसगाव डांगसह परिसरातील अनेक गावांच्या आरोग्यसेवेचा मुख्य आधार असलेल्या कोतुळ ग्रामीण रुग्णालयातील मूलभूत सुविधांचा अभाव आणि प्रशासकीय

कर्जमाफी शासन आदेशाची अकोलेत होळी; किसान सभेचे राज्यव्यापी आंदोलन
दहावीच्या परीक्षे गणोरे केंद्रात आर्यन विवेक आंबरे प्रथम
दहीवीच्या परीक्षेत अगस्ती विद्यालयाची चमकदार कामगिरी

अकोले : चाळीसगाव डांगसह परिसरातील अनेक गावांच्या आरोग्यसेवेचा मुख्य आधार असलेल्या कोतुळ ग्रामीण रुग्णालयातील मूलभूत सुविधांचा अभाव आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे रुग्णांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च होत असतानाही रुग्णालयाची अवस्था दिवसेंदिवस खालावत असल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कोतुळ ग्रामीण रुग्णालयात मोठा कर्मचारी वर्ग कार्यरत असला, तरी काही कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार आणि उद्धट वर्तनामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. वेळेवर सेवा मिळत नसल्याने अनेक रुग्ण खाजगी दवाखान्यांचा पर्याय स्वीकारत आहेत. रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे दरवाजे रात्रीच्या वेळी उघडेच राहत असल्याने आवारात मद्यपी, असामाजिक घटकांचा वावर आणि वाहनांचे बेकायदेशीर पार्किंग वाढले आहे. त्यातच परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून काही दिवसांपूर्वी दोन बिबट्यांनी आवारात भटक्या कुत्र्यांवर हल्ला केल्याची घटना घडल्याने रुग्ण, नातेवाईक आणि निवासी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

रुग्णालयातील प्रकाश व्यवस्थाही पूर्णपणे कोलमडली आहे. सौरऊर्जेवरील प्रकाशयोजनेसाठी मोठा निधी खर्च करण्यात आला असला, तरी देखभालीअभावी सौरदिवे बंद पडले आहेत; तर काही ठिकाणच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने रात्रीच्या वेळी परिसर अंधारात बुडालेला असतो. याशिवाय अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे रुग्णालयातील झाडे सुकू लागली असून रुग्णांनाही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. हे रुग्णालय केवळ शोभेची इमारत न राहता सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्यसेवा देणारे केंद्र बनावे, अशी रास्त अपेक्षा आता नागरिक व्यक्त करत आहेत.

COMMENTS