Homeताज्या बातम्या

शेतातील गवत काढण्यावरून दोन गटात वाद

कोपरगाव शहर : तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे शेतातील काँग्रेस गवत काढण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरा

दारूच्या नशेत पोलिसांना खोटा कॉल; मद्यपीविरुद्ध गुन्हा
अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनसंशयिताविरुद्ध ‘पॉक्सो’अंतर्गत गुन्हा
दोन सख्ख्या बहिणींना जाळ्यात ओढून अत्याचारतक्रारीनंतर आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची मोहीम
Clash between two groups; 12 injured, increased police force deployed, condition of two critical

कोपरगाव शहर : तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे शेतातील काँग्रेस गवत काढण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात परस्परांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्राह्मणगाव येथील बबन महादू साबळे हे ३१ मे रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास गट क्रमांक ४८१/३ मधील शेतात काँग्रेस गवत काढत होते. त्यावेळी मनीषा रावसाहेब साबळे व ताराबाई साहेबराव चव्हाण तेथे आल्या. संबंधित जमीन आमची असून तुम्ही आमच्या शेतातील गवत का काढत आहात, असा जाब विचारण्यात आला.
यावरून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला. वादाचे रूपांतर शिवीगाळ व दमदाटीत झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार वलवे पुढील तपास करीत आहेत.

COMMENTS