अहमदनगर – औरंगाबाद रेल्वे मार्गाला चालना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; देवगड, नेवासा व शनिशिंगणापूरला होणार अधिक लाभ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर – औरंगाबाद रेल्वे मार्गाला चालना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; देवगड, नेवासा व शनिशिंगणापूरला होणार अधिक लाभ

नेवासाफाटा ; प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत औरंगाबादच्या विविध विकासकामांना फास्ट ट्रॅकवर पूर्ण करण्य

पूरग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांच्याबरोबर शेतकरी व विध्यार्थी यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार! l LokNews24
पोलीस आयुक्तालयासमोर तरूणानं घेतलं पेटवून l DAINIK LOKMNTHAN
तहसीलदार ज्योती देवरे यांच्या गैरकारभाराची व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा l LokNews24

नेवासाफाटा ; प्रतिनिधी –

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत औरंगाबादच्या विविध विकासकामांना फास्ट ट्रॅकवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच राज्याच्या संस्कृतीचे प्रतीक असणारे श्री संत एकनाथ महाराज संतपीठात अभ्यासक्रम सुरु करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे संत परंपरा आणि साहित्याच्या अभ्यास-संशोधनाला चालना मिळणार आहे. औरंगाबाद- अहमदनगर रेल्वेमार्गासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करून, हा मार्ग पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार सहकार्य करेल, असेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.


सध्याऔरंगाबाद-मनमाड- अहमदनगर असे २६५ किलोमीटरचे रेल्वेचे अंतर आहे. याला पर्याय म्हणून औरंगाबाद – अहमदनगर अशी ११२ किलोमीटरचा रेल्वेमार्ग प्रस्तावित करण्यात आला असून हा मार्ग झाल्यास मोठ्या प्रमाणावर उद्योग आणि व्यापारास चालना मिळेल, असे जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी सांगितले.

डीएमआयसी आणि ऑरीक सिटीमधील उद्योगाशी निगडीत मोठ्या प्रमाणात मालवाहतूक सध्या रस्ते मार्गे होते. ती या प्रस्तावित रेल्वेमार्गे झाल्याने वेळेची आणि खर्चाची बचत होणार आहे.केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्याची व्यवहार्यता तपासली आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.

त्यावर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे या नवीन मार्गासाठी वेगाने पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले. तसेच या मार्गासाठी राज्य सरकारकडून सर्व ते सहकार्य देण्यात येईल असे सांगितले.

नेवासा, देवगड व शनिशिंगणापूरला होणार अधिक लाभ:औरंगाबाद- नगर हा रेल्वेमार्ग साजापूर ,वाळुंज, गंगापूर, देवगड, नेवासा आणि शनिशिंगणापूर या मार्गांनी नगरपर्यंत जाणार आहे हा रेल्वेमार्ग झाल्यास त्याचा थेट फायदा अहमदनगर मराठवाड्यातील तसेच नगर जिल्ह्यातील उद्योजकांना तसेच कृषी उत्पादित मालाची वाहतूक करणाऱ्या व व्यावसायिकांना होणार आहे .

तसेच देवगड नेवासा आणि शनिशिंगणापूर येथे मराठवाड्यातील भाविक मोठ्या संख्येने येतील त्याचा लाभही नगर जिल्ह्यात होणार आहे तसेच नगर ,नेवासा, शेवगाव या भागातील अनेक तरुण औरंगाबाद येथील एमआयडीसी रोजगारासाठी जात असतात त्यांनाही लाभ होणार आहे शिवाय दोन्ही जिल्ह्यातील प्रवाशांची आर्थिक बचत होणार आहे.


औरंगाबाद – शिर्डी हवाई मार्ग: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे औरंगाबाद ते शिर्डी हे ११२.४० किलोमीटरचे काम वेगाने पूर्ण होत असून औरंगाबाद व शिर्डी विमानतळ जोडले जाईल, अशी माहिती देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद-शिर्डी या मार्गावर विमान सेवा सुरु झाल्यास पर्यटकांसाठी मोठी सुविधा निर्माण होणार

असून याही पर्यायाचा विचार करावा असे सांगितले. याचा लाभ साई भक्तांना होणार आहे. या सुविधेमुळे दोन्ही जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळणार आहे.

भविष्यात अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे, त्यामुळे सर्व स्तरावरून रेल्वे कधी आपल्या परिसरात येईल याची उत्सुकता प्रत्येक नागरिकाला लागलेली आहे.

COMMENTS