ढवळपुरीत ‘रेकॉर्ड ब्रेक’ लसीकरण, एकाच दिवसात तब्बल अकराशे नागरिकांनी घेतली लस.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ढवळपुरीत ‘रेकॉर्ड ब्रेक’ लसीकरण, एकाच दिवसात तब्बल अकराशे नागरिकांनी घेतली लस.

भाळवणी (प्रतिनिधी):-पारनेर तालुक्यातील आदिवासी बहूल असणाऱ्या ढवळपुरीमध्ये रेकार्ड ब्रेक लसीकरण झाले आहे. एकाच दिवसात तब्बल अकराशे नागरिकांनी लस घ

पारनेर तहसीलदार ज्योती देवरेंच्या ऑडिओ क्लीपने राज्यात भूकंप; आत्महत्या इशार्‍याने खळबळ, प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
अनधिकृतपणे आर्थिक हित साधून ५ G मोबाईल टॉवरला परवानगी दिल्याचा आरोप… लोकायुक्तांकडे तक्रार
चक्क भिकारी व अल्पवयीन मुलांच्या नावावर लाखोंचे कर्ज…;शेवगाव नगर अर्बन बँक बनावट सोने तारण घोटाळ्याच्या सुरस कथा चर्चेत

भाळवणी (प्रतिनिधी):-
पारनेर तालुक्यातील आदिवासी बहूल असणाऱ्या ढवळपुरीमध्ये रेकार्ड ब्रेक लसीकरण झाले आहे. एकाच दिवसात तब्बल अकराशे नागरिकांनी लस घेतली. सुमारे ७ हजार लाभार्थ्यांपैकी ३४०० नागरिक आत्तापर्यंत लस घेऊन संरक्षित झाले आहेत. लसीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्याने गैरसमज न बाळगता नागरिकही लस घेण्यासाठी उस्फूर्तपणे पुढे येत आहेत.संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी लसीकरण हे आता कवच कुंडलच ठरणार आहे.

भौगोलिक दृष्ट्या विस्ताराने मोठे असलेले अठरापगड जातीधर्म व बारा वाडयांचे गाव म्हणून राज्यात ढवळपुरीची ओळख आहे. गावची लोकसंख्याही मोठीच त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे हे काम मोठया जिकिरीचे होते. मात्र आरोग्य यंत्रणा, आशा सेविका, ग्रामपंचायत, शिक्षण संस्था व स्थानिक स्वयंसेवक युवकांच्या सहभागातून लसीकरणाचे हे काम शक्य झाले. आत्तापर्यंत एकुण पात्र लाभार्थ्यांपैकी सुमारे पन्नास टक्के नागरीकांनी कोणतीही भीती न बाळगता लसीकरण करुन घेतले. यामध्ये ठाकर, बंजारा, धनगर, मागासवर्गीय समाजाचा मोठा सहभाग होता.

ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी, आरोग्य यंत्रणा, आशासेविका, स्वयंसेवकांनी वाड्या वस्त्यांवर जावून लसीकरणाबाबत केलेल्या जनजागृतीमुळे एकाच दिवसात अकराशे नागरीकांनी लसीकरणाचा लाभ घेत रेकॉर्ड ब्रेक केले. सुमारे सहा लॅपटॉपद्वारे हे काम करण्यात आले. दुर्गादेवी विद्यालयाचेही या कामी सहकार्य लाभले. लसीकरणाची ही मोहीम राबवण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ. मानसी मानुरकर यांचे विशेष सहकार्य यावेळी लाभले.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पाहता आरोग्य विभागाला कोविशिल्डचा लस साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळेच लसीकरणाचा वेगही वाढत आहे. ढवळपुरीसारख्या आदिवासी बहूल गावात एकाच दिवशी अकराशे नागरीकांचे झालेले लसीकरण ही समाधानकारक बाब आहे. उर्वरीत नागरिकांनी मनात भिती न बाळगता लसीकरणासाठी पुढे यावे.

COMMENTS