Homeताज्या बातम्याराजकारण

तमिळनाडूत अन्नामलाईंचा भाजपला धक्कानव्या पक्षाची घोषणा, 2031 च्या निवडणुकीवर लक्ष

चेन्नई : तमिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी भाजपमधून बाहेर पडत स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. सामाजिक म

..ही तर मोदी सरकारच्या अपयशाची कबुली : खा. राहुल गांधी
राहुल गांधी भारतीय राजकारणातील सर्वाधिक ‘रिजेक्टेड’ व्यक्ती; देवेंद्र फडणवीसांचा दिल्लीतून जोरदार प्रहार
गोदावरी महामंडळ कार्यालय स्थलांतराचा विखेंचा ‘बालहट्ट’खा. निलेश लंके ; निर्णय मागे घेतला नाही तर संघर्ष अटळ  


चेन्नई : तमिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी भाजपमधून बाहेर पडत स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या संदेशातून त्यांनी नव्या राजकीय चळवळीची सुरुवात होत असल्याचे जाहीर करत, आगामी 2031 च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्धार व्यक्त केला. या निर्णयामुळे राज्यातील राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून भाजपलाही मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.
अन्नामलाई यांनी सांगितले की, तमिळ समाजाच्या हिताच्या प्रश्‍नांशी बांधिलकी कायम ठेवणे आणि भाजपमध्ये राहणे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी शक्य होत नसल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांनी गेल्या वर्षीच पक्षश्रेष्ठींना आपला निर्णय कळविला होता. मात्र, पक्षाने त्यांना निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत थांबण्याची विनंती केली होती. अखेर 2 जून रोजी त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांचा निर्णय सार्वजनिक झाला. राजीनामा पत्रात अन्नामलाई यांनी गेल्या दीड वर्षांपासून पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी विविध विषयांवर मतभेद असल्याचे नमूद केले आहे. विचारसरणी आणि राजकीय भूमिकांमध्ये वाढत गेलेले अंतर हेच पक्ष सोडण्यामागील प्रमुख कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अन्नामलाई हे गेल्या सहा वर्षांपासून भाजपशी संबंधित होते. त्यांच्या नेतृत्वकाळात पक्षाने तमिळनाडूमध्ये संघटनात्मक विस्तार साधला. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत सुमारे अडीच टक्के मतांवर असलेला पक्ष 2026 मध्ये अकरा टक्क्यांहून अधिक मतांपर्यंत पोहोचल्याचे राजकीय विश्‍लेषकांचे मत आहे. त्यामुळे राज्यातील भाजपचा सर्वात प्रभावी चेहरा म्हणून अन्नामलाई यांची ओळख निर्माण झाली होती.
अन्नामलाई यांच्या पक्षत्यागाची चिन्हे काही महिन्यांपासून दिसत होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने त्यांच्याऐवजी नैनार नागेंद्रन यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. याशिवाय अन्नामलाई यांनी केंद्रीय शिक्षण धोरणातील त्रिभाषिक सूत्राच्या अंमलबजावणीबाबतही स्वतंत्र भूमिका घेतली होती. तसेच काही राजकीय आघाड्यांबाबतही त्यांचे पक्षाशी मतभेद असल्याच्या चर्चा सातत्याने होत होत्या. राजीनाम्यापूर्वी अन्नामलाई यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर काही दिवसांतच त्यांच्या राजीनाम्याला मान्यता मिळाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला.

COMMENTS