Homeताज्या बातम्या

पाण्याच्या वादातून कुऱ्हाडीने हल्ला; लोहगाव शिवारातील घटनेप्रकरणी दोघांवर सोनईत गुन्हा दाखल

सोनई : नेवासा तालुक्यातील लोहगाव शिवारात पाण्याच्या वादातून एका शेतकऱ्यावर कुऱ्हाडीच्या दांड्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रक

कर्जतमध्ये हॉटेलमधील आचाऱ्याचा निर्घृण खून; उत्तर प्रदेशातील तीन आरोपींना दौंड रेल्वेस्थानकावरून घेतले ताब्यात
प्रशिक्षणादरम्यान पोलीस मुख्यालयात ‘हँडग्रेनेड’चा स्फोट; चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी, प्रकृती स्थिर
अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात लग्नकार्यासाठी नेलेले लाखो रुपयांचे दागिने हडप
मराठवाडा Archives - Page 100 of 266 - Lokmanthan | लोकमंथन

सोनई : नेवासा तालुक्यातील लोहगाव शिवारात पाण्याच्या वादातून एका शेतकऱ्यावर कुऱ्हाडीच्या दांड्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध मारहाण, दुखापत व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव शिवारातील रहिवासी व शेतकरी सचिन जालिंदर तनपुरे (वय २७) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ३१ मे रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरासमोर ही घटना घडली.

फिर्यादी सचिन तनपुरे यांनी आपल्या शेतातील पाण्याची मोटार सुरू केली असता, त्याठिकाणी आरोपी हिराबाई शिवाजी तनपुरे व मिनीनाथ तनपुरे हे आले. यावेळी पाण्याच्या वापराबाबत दोन्ही बाजूंमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्यानंतर आरोपींपैकी एकाने फिर्यादीचा हात धरून ठेवला, तर दुसऱ्या आरोपीने हातातील कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच, “पुन्हा आमच्या नादी लागलास तर तुला जिवे मारून टाकू,” अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी सचिन तनपुरे यांच्यावर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल, विळदघाट (अहिल्यानगर) येथे उपचार सुरू असून सोनई पोलीस पुढील तपास करत आहेत.

COMMENTS