Homeताज्या बातम्या

बीडमध्ये अधिकमासानिमित्त भव्य ’श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहा’चे आयोजन

बीड : अधिकमासाचे औचित्य साधून बीड शहरातील दत्तधाम परिवाराच्या वतीने श्री प्रभू दत्तात्रेयाच्या कृपाशीर्वादाने भव्य ’श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ स

शेतकरी संघटनेचे निवासी  कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर
घरकुल लाभार्थ्यांचे हप्ते तातडीने द्या; खा.बजरंग सोनवणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्रबीड जिल्ह्यात 54 हजार घरकुलांचे हप्ते रखडले
हर्मिका जगतकर हिचे बारावी विज्ञान शाखेत घवघवीत यश

बीड : अधिकमासाचे औचित्य साधून बीड शहरातील दत्तधाम परिवाराच्या वतीने श्री प्रभू दत्तात्रेयाच्या कृपाशीर्वादाने भव्य ’श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह सोमवार, १ जून २०२६ ते रविवार, ७ जून २०२६ या कालावधीत संपन्न होत असून, भाविकांना सुप्रसिद्ध कथाकार ह.भ.प. विश्वंभर महाराज मुळे (गोंदीकर) यांच्या सुश्राव्य वाणीतून कथा श्रवणाचा लाभ घेता येत आहे.

या ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये दररोज दुपारी ३.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत कथेचे निरूपण केले जात आहे. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी, १ जून रोजी सकाळी १०.०० वाजता कलश पूजन व श्रीमद् भागवत ग्रंथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक दत्तधाम परिसर, श्रीकृष्ण नगर आणि फुलाई नगर मार्गे मार्गस्थ होऊन मंदिरात पोहोचली.

सध्या कथेचा तिसरा दिवस असून भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे. दररोज कथेच्या समाप्तीनंतर यजमान आणि उपस्थित अतिथींच्या हस्ते भागवत ग्रंथाची आरती करून महाप्रसादाचे वाटप केले जाते. या सोहळ्याची सांगता रविवारी, ७ जून रोजी होणार असून या दिवशी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या पवित्र कार्यक्रमात सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन १३ यजमान आणि समस्त दत्तधाम परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS