Homeताज्या बातम्या

शिर्डी-नाशिक महामार्गावर बस-कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, १५ जखमी

शिर्डी : शिर्डी-नाशिक महामार्गावरील सावळीविहीर परिसरात राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसची आणि एका चारचाकी वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन दो

पाथर्डी पोलिसांचा अवैध दारू व्यवसायावर छापा; गावठी हातभट्टी उद्ध्वस्त करून आरोपीला अटक
अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १८ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त
संगमनेरमध्ये रक्षक दलाच्या सतर्कतेमुळे एटीएमची चोरी टळली

शिर्डी : शिर्डी-नाशिक महामार्गावरील सावळीविहीर परिसरात राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसची आणि एका चारचाकी वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर सुमारे १५ प्रवासी जखमी झाले. शनिवारी घडलेल्या या भीषण अपघातामुळे महामार्गावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलहून शिर्डीकडे येणारी एसटी बस नियमित प्रवासी वाहतूक करत होती. त्याचवेळी एक चारचाकी वाहन नाशिकच्या दिशेने जात असताना सावळीविहीर परिसरात दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, चारचाकी वाहनाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

या दुर्घटनेत दोन्ही वाहनांमधील मिळून १५ जण जखमी झाले आहेत. काही जणांना किरकोळ दुखापती झाल्या असून काहींची प्रकृती गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळताच शिर्डी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्परता दाखवत स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. गंभीर जखमींना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी पोलिसांनी स्वतःच्या वाहनांचा वापर करून त्यांना शिर्डी येथील साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी प्रयत्न करून सुरळीत केली.

COMMENTS