Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महायुती मजबूत, तरी काँग्रेसचा आक्रमक डाव; विधान परिषद निवडणुकीत रंंगणार राजकीय थरार!

नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. एकेकाळी काँग्

तटकरे – पटेल यांची स्थिती नेमकी काय?
राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारीखासदार प्रफुल्ल पटेल यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून ओळख
तटकरे विरूद्ध रोहित पवार वाद उफाळलावर्षा निवासस्थानाचे उंबरठे कोणी झिजवले ?

नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. एकेकाळी काँग्रेसचा अभेद्य गड मानला जाणारा हा मतदारसंघ आता महायुतीच्या प्रभावाखाली गेला असला, तरी काँग्रेसने संघर्षातून माघार घेण्यास नकार देत ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे संख्याबळ अपुरे असतानाही काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने या निवडणुकीला अनपेक्षित वळण मिळण्याची चिन्हे आहेत.

माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडमधील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली. महापालिका, नगरपालिका आणि इतर अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप व महायुती समर्थकांची सत्ता निर्माण झाली आहे. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या एकत्रित ताकदीमुळे कागदोपत्री महायुतीचे पाशडे स्पष्टपणे जड दिसत आहे. त्यामुळे ही निवडणूक महायुतीसाठी तुलनेने सोपी मानली जात होती. मात्र, काँग्रेसने वेगळाच राजकीय डाव टाकत निवडणुकीत थेट उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

शुक्रवारी झालेल्या बैठकीत खासदार रवींद्र चव्हाण यांनी ‘मोठा भाऊ’ म्हणून काँग्रेसच उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. या घोषणेनंतर राजकीय चर्चांना वेग आला असून काँग्रेसच्या हालचालींमुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणांकडेही लक्ष वेधले गेले आहे. स्थानिक पातळीवर भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातील नाराजी, सत्तावाटपातील मतभेद आणि नेतृत्वाच्या स्पर्धेचा फायदा काँग्रेस उचलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. काँग्रेसने केवळ आपल्या मतांवर विसंबून न राहता पडद्यामागे संपर्क मोहीमही सुरू केल्याचे बोलले जात आहे.

उमेदवारीसाठी इच्छुकांंमध्ये चुरस काँग्रेसने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेताच पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उमेदवारीसाठी अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून माजी आमदार माधवराव जवळगावकर, विजय चव्हाण, रामदास पाटील, राजेश पाबळे यांची नावे चर्चेत आहेत. काही इच्छुकांनी थेट दिल्ली दरबारात फील्डिंग लावत हाय कमांडमार्फत उमेदवारी निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचीही चर्चा आहे.

काँग्रेसचा ‘प्लॅन बी’ सक्रिय सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिंदे गटातील काही नाराज सदस्यांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. निवडणुकीदरम्यान मतांचे ध्रुवीकरण, क्रॉस व्होटिंग आणि राजकीय दबावतंत्राचा वापर होण्याची शक्यता गृहीत धरून काँग्रेसने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे संख्याबळात मागे असूनही काँग्रेस ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.

“विधान परिषद निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत. काँग्रेससह सर्व समविचारी पक्षांच्या मतदारांशी संवाद साधून उमेदवार निश्चित केला जाईल. अनेकांना बदल हवा आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वमान्य चेहरा पुढे आणू. लवकरच घटक पक्षांची बैठक घेण्यात येईल.” – खा. रवींद्र चव्हाण

COMMENTS