अंबाजोगाई : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील भूलतज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉ. अभिमन्यू तरकसे यांचा मंगळवारी सकाळी तलावा

अंबाजोगाई : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील भूलतज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉ. अभिमन्यू तरकसे यांचा मंगळवारी सकाळी तलावात बुडाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे अंबाजोगाई शहरासह वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. डॉ. तरकसे हे दररोज सकाळी शहरालगत असलेल्या काष्टी साठवण तलावात पोहण्यासाठी जात असत. मंगळवारी सकाळीही ते नेहमीप्रमाणे एकटेच तलावावर गेले होते. पोहताना सुरक्षिततेसाठी त्यांनी पाण्याची रिकामी बाटली कमरेला बांधली होती, अशी माहिती समोर आली आहे.

COMMENTS