इम्फाळ : मणिपूरमधील महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 2 गेल्या पाच दिवसांपासून बंद असल्याने राज्यातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. क

इम्फाळ : मणिपूरमधील महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 2 गेल्या पाच दिवसांपासून बंद असल्याने राज्यातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. कुकी समाजाच्या धर्मगुरूंच्या हत्येप्रकरणी कारवाईची मागणी तसेच सेनापती परिसरातून अपहरण करण्यात आलेल्या 14 कुकी नागरिकांची सुटका करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत विविध संघटनांनी आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या बंदमुळे राज्यातील जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे.
मणिपूरची ‘जीवनवाहिनी’ मानल्या जाणार्या या महामार्गावर सेनापती जिल्ह्यातील खोंगनेम ते टी. खुल्लेनदरम्यान एक हजारांहून अधिक ट्रक, बस आणि इतर वाहने अडकून पडली आहेत. अत्यावश्यक वस्तू, इंधन आणि अन्नधान्याचा पुरवठा विस्कळीत झाल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. दरम्यान, कुकी इन्पी या संघटनेने आंदोलनाचा कालावधी आणखी 48 तासांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकार आणि राज्य प्रशासनाने अद्याप ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

COMMENTS