Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

राज्यातील 15 जिल्ह्यांत 706 टँकरद्वारे पाणीपुरवठा

मुंबई : राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी शासना

दारूच्या नशेत एकीने घेतला गळफास तर दुसरी बेशुद्ध
हवामान बदलाचा फटका समुद्रकाठच्या शहरांना बसणार
गाडी दरीत कोसळली, 12 जणांचा जागीच मृत्यू


मुंबई : राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी शासनाने विविध जिल्ह्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवला आहे. दिनांक 11 मे ते 17 मे 2026 दरम्यानच्या कालावधीतील अहवालनुसार राज्यातील 15 जिल्ह्यांतील 633 गावे आणि 1652 वाड्यांमध्ये एकूण 706 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या टँकरमध्ये 33 शासकीय तर 669 खासगी टँकरचा समावेश आहे. वाढत्या तापमानामुळे विहिरी, बोअरवेल आणि लहान पाणीस्त्रोत कोरडे पडू लागल्याने अनेक ग्रामीण भागांमध्ये टँकर हा नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रमुख आधार ठरत आहे. ठाणे विभागात सर्वाधिक 177 गावे आणि 572 वाड्यांमध्ये 155 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर नाशिक विभागात 156 गावे आणि 444 वाड्यांसाठी 159 टँकर कार्यरत आहेत. पुणे विभागात 145 गावे आणि 572 वाड्यांमध्ये 131 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 138 गावे आणि 64 वाड्यांसाठी एकूण 244 टँकर कार्यरत असून राज्यातील सर्वाधिक टँकर या विभागात वापरण्यात येत आहेत. अमरावती विभागात 17 गावांसाठी 17 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागपूर विभागात सध्या कोणत्याही ठिकाणी टँकरची आवश्यकता भासलेली नाही.

COMMENTS