Homeताज्या बातम्यादेश

प्रेमानंदजींची प्रकृती खालावली ; पदयात्रा स्थगित

मथुरा : संत प्रेमानंद महाराज यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांच्या नियमित पदयात्रेसह एकांतिक दर्शन कार्यक्रम अनिश्‍चित काळासाठी स्थगित करण्यात

 विनयभंगप्रकरणी आरोपीला एक वर्षाची शिक्षा 
तापी-नर्मदा नदीजोड विरोधात आदिवासींचा ठिय्या !
पुणे विद्यापीठात अभाविपचा जोरदार राडा


मथुरा : संत प्रेमानंद महाराज यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांच्या नियमित पदयात्रेसह एकांतिक दर्शन कार्यक्रम अनिश्‍चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे दर्शनासाठी दूरदूरवरून आलेल्या हजारो भक्तांना निराश होऊन परतावे लागले. रविवारी मध्यरात्रीनंतर मोठ्या संख्येने भक्त महाराजांच्या दर्शनासाठी जमले होते. दररोजप्रमाणे पहाटे तीन वाजता महाराज पदयात्रेसाठी बाहेर पडतील, अशी अपेक्षा होती. मात्र, यावेळी महाराज स्वतः न येता त्यांच्या शिष्यांनी उपस्थित भक्तांना माहिती दिली. शिष्यांनी ध्वनिक्षेपकाद्वारे घोषणा करत सांगितले की, महाराजांची प्रकृती सध्या ठीक नसल्यामुळे पदयात्रा पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात आली आहे.

COMMENTS