Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

होर्मुझ सामुद्रधुनीतील भारतीय जहाजांवरील हल्ले अस्वीकारार्ह; भारताने मांडली संयुक्त राष्ट्रांमध्ये ठाम भूमिका

न्यूयार्क : पश्चिम आशियात वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर सागरी सुरक्षेचा मुद्दा ठामपणे मा

अमेरिकेचे इराणवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीजवळ तणाव वाढला
अखेेर दोन आठवड्यांचा युद्धविराम; होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याची अमेरिकेची अट
अखेेर दोन आठवड्यांचा युद्धविराम; होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याची अमेरिकेची अट

न्यूयार्क : पश्चिम आशियात वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर सागरी सुरक्षेचा मुद्दा ठामपणे मांडला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले, तसेच नागरी कर्मचाऱ्यांच्या जीविताला निर्माण झालेला धोका अस्वीकारार्ह असल्याचे भारताने स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पी. हरीश यांनी ही भूमिका मांडताना आंतरराष्ट्रीय सागरी कायद्याचे काटेकोर पालन होणे आवश्यक असल्यावर भर दिला.

संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या विशेष बैठकीत बोलताना त्यांनी पश्चिम आशियातील संघर्षामुळे ऊर्जा पुरवठा, खतांची उपलब्धता आणि जागतिक व्यापार व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगितले. या संकटाचा सामना करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांसह दीर्घकालीन धोरणांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले. हरीश यांनी स्पष्ट केले की, जगातील महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीत सुरक्षित नौकायन अबाधित राहणे अत्यंत आवश्यक आहे.

इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील सागरी वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी नव्या व्यावसायिक यंत्रणेची घोषणा केली आहे. इराणच्या संसदेतील राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख इब्राहिम अझीझी यांनी ही माहिती दिली. पश्चिम आशियातील तणाव वाढत असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता करार न झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असा इशारा दिला आहे. दुसरीकडे, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराखची यांनी या संघर्षातील शांततेच्या प्रयत्नांमध्ये अमेरिका हा मुख्य अडथळा असल्याचा आरोप केला आहे.

ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय जहाजावर झाला होता हल्ला काही दिवसांपूर्वी ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय ध्वज असलेल्या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर हा मुद्दा अधिक संवेदनशील बनला आहे. सोमालियाहून निघालेल्या या जहाजावरील सर्व १४ कर्मचाऱ्यांची ओमान प्रशासनाने सुरक्षित सुटका केली होती. मात्र, हल्लेखोरांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. या घटनेनंतर भारताने सागरी सुरक्षेचा प्रश्न अधिक गांभीर्याने मांडत आंतरराष्ट्रीय समुदायाला सहकार्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS