केज विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व आणि पन्नगेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन अक्षय भैय्या मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाई येथे भव्य रक्त

केज विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व आणि पन्नगेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन अक्षय भैय्या मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाई येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. वसुंधरा सेवा प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या शिबिरात तब्बल 135 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला.
वाढदिवस केवळ हार-तुरे आणि सत्कारांपुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच अंबाजोगाई तालुक्यातील युवक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी शिबिरस्थळी मोठी गर्दी केली होती. रक्तदान हेच श्रेष्ठ दान हा संदेश देत अनेक युवकांनी प्रथमच रक्तदान करत आपला आनंद व्यक्त केला. शिबिरादरम्यान वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकाकडून प्रत्येक रक्तदात्याची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. सुरक्षिततेचे सर्व निकष पाळून रक्त संकलन प्रक्रिया पार पडली. वाढदिवसानिमित्त समाजासाठी अत्यंत उपयुक्त असा उपक्रम राबवल्याबद्दल अक्षय भैय्या मुंदडा समर्थकांचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी वसुंधरा सेवा प्रतिष्ठान आणि भाजप अंबाजोगाई तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये अमोल पवार, अनंत आरसुडे, महादू मस्के, बळीराम चोपणे, सत्यप्रेम इंगळे आणि मंदार काटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. वाढदिवसाचा आनंद जेव्हा समाजोपयोगी कार्यातून साजरा होतो, तेव्हा त्याचे समाधान अधिक मोठे असते. 135 रक्तदात्यांचे हे योगदान अनेक गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार आहे, असे मत आयोजकांनी व्यक्त केले.

COMMENTS