Homeताज्या बातम्याअहमदनगर

निळवंडे सोसायटीच्या अध्यक्षपदी पवार तर पठाण उपाध्यक्ष

संगमनेर : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या निळवंडे - करुले विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी पोपटराव रामभाऊ पवार

पिके जळू लागल्याने पारनेरमध्ये शेतकरी आक्रमक खडकवाडी वीज केंद्रावर ठिय्या आंदोलन
इथेनॉल हे इंधनाला सर्वोत्तम पर्यायमाजी मंत्री थोरात ; थोरात कारखान्यातून दीड कोटी लिटर इथेनॉल निर्मिती
यशवंत विद्या पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रा. पवार तर शेळके उपाध्यक्ष

संगमनेर : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या निळवंडे – करुले विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी पोपटराव रामभाऊ पवार तर उपाध्यक्षपदी मुहम्मद खुशुद्दीन पठाण यांची बिनविरोध निवड झाली आहे.या निवडीबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्यांचा यशोधन कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी रामहरी कातोरे, मेजर महेंद्र सोनवणे, मुंबई पोलीस सचिन सोनवणे, पीएसआय महेश बोऱ्हाडे, निळवंडे सोसायटीचे संचालक अशोक उकिर्डे, छाया शेटे, भाऊसाहेब वारे, ज्योती पवार, रावसाहेब उकिर्डे, बाळासाहेब पवार, हरिभाऊ पवार आदी मान्यवर उपस्थित होते.या निवडकामी सहकार अधिकारी म्हणून राजेश जोशी व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सचिव मोहन पवार यांनी काम पाहिले. यावेळी करुले गावचे सरपंच बाळासाहेब आहेर, विकास पवार, प्रभाकर पवार, रामनाथ पवार,गोविंद उकिर्डे, सा. का. सुनील उकिर्डे, अशोक केरे, गंगाधर पवार, दत्तात्रय पवार , रायभान पवार, पोपटराव पवार, साहेबराव पवार, माधव पवार, उत्तम माधव पवार, उत्तम गणपत पवार, राजू गायकवाड, भाऊसाहेब पवार, सुदाम उकिरडे, अरुण पवार आदींसह मान्यवर उपस्थित होते.या नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचे लोकनेते बाळासाहेब थोरात, डॉ.सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे, कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात आदींनी अभिनंदन केले.

COMMENTS