Homeताज्या बातम्याअहमदनगर

जामखेडमध्ये आठ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्तस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; वाहनासह मुद्देमाल ताब्यात

जामखेड : जामखेड शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध देशी-विदेशी मद्यविक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर करण्यात आले

पोटच्या मुलाने केली बापाची हत्याजामखेड तालुक्यातील अरणगाव येथील घटना ; आरोपी ताब्यात
 चाकू हल्ल्यात तरुण गंभीर जखमी
चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी नागरिकच ‘गस्ती’वर ‘अलर्ट सिस्टीम’मुळे सुरक्षा वाढली;प्रवरा पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ

जामखेड : जामखेड शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध देशी-विदेशी मद्यविक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत आठ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस अंमलदार श्यामसुंदर जाधव, सुनील मालणकर, प्रकाश मांडगे, मनोज साखरे तसेच चालक भगवान धुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.गुरुवारी (दि. १४ मे) स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गुप्त माहितीदारामार्फत एका व्यक्तीकडून बोलेरो वाहनातून देशी व विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खर्डा रस्त्यावरील मारुती मंदिराजवळ सापळा रचण्यात आला.यावेळी बोलेरो वाहन क्रमांक एमएच १६ डीएम ९२४४ मधून मद्याची वाहतूक करणाऱ्या शरद बाबासाहेब शिकारे (वय ३७, रा. शिकारेवस्ती, बाळगव्हाण, ता. जामखेड) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ६३ हजार रुपये किमतीचे देशी-विदेशी मद्य तसेच साडेसात लाख रुपये किमतीचे बोलेरो वाहन असा एकूण ८ लाख १३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.अहिल्यानगर जिल्ह्यात कुठेही अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या ०२४१-२४१६१११ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा ११२ या क्रमांकावर द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

COMMENTS