Homeताज्या बातम्याबीड

बीडच्या शिक्षणाधिकार्याकडून उच्च न्यायालयाचा अवमानशिक्षणाधिकारी व संबंधित लिपिकास उच्च न्यायालयाची नोटीस

जय हिंद विद्या प्रसारक मंडळ तांदळा येथील लिपिक सुधाकर शेळके यांना संस्थेने पदावरून काढून टाकले होते. शेळके यांना रुजू करण्यात यावे असे आदेश शाळा

शेतकर्‍यांना कृषी विभागाचे आवाहनकडधान्य प्रक्रिया केंद्रासाठी अर्ज सादर करावेत
सय्यद समीया दहावीच्या परीक्षेत यश
महांडुळा ग्रामपंचायतीने गोरगरिबांना दिला आधारसरपंच श्री. शामद भाई शेख, ग्रामसेवक संदीप काकडे व उपसरपंच सिकंदर शेख यांच्या उपस्थितीत गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप



जय हिंद विद्या प्रसारक मंडळ तांदळा येथील लिपिक सुधाकर शेळके यांना संस्थेने पदावरून काढून टाकले होते. शेळके यांना रुजू करण्यात यावे असे आदेश शाळा प्राधिकरणाने दिले होते. या आदेशाच्या विरोधात संस्थेच्या सचिव भारती पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने शाळा प्राधिकरणाच्या आदेशाला स्थगिती दिली होती. मात्र तरीही शिक्षणाधिकारी प्रिया राणी पाटील यांनी सुनावणी घेऊन संबंधित लिपिक शेळके यांना रुजू करून घेण्यात यावे असे आदेश दिले. या संदर्भात संस्थेच्या सचिव भारतीय पाटील यांनी हा उच्च न्यायालयाचा अवमान असल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास  आणून दिले. हा न्यायालयाचा अवमान असल्याने या अवमान याचिकेवर 15 जून रोजी न्यायालयाने सुनावनी ठेवली आहे. या संदर्भात शिक्षणाधिकारी प्रिया राणी पाटील व संबंधित लिपिक शेळके यांना नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती एड. नरसिंह जाधव यांनी दिली.
जयहिंद विद्या प्रसारक मंडळ तांदळा ता. गेवराई जि. बीड संस्थेच्या सचिव भारती विशाल पाटील यांनी मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठांमध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद बीड प्रियारणी पाटील यांच्या विरोधामध्ये अवमान याचीका क्रमांक 281/2026 ड. नरसिंह जाधव यांच्या मार्फत दाखल केली असून सदरील प्रकरणांमध्ये साहेबराव पाटील विद्यालय तांदळा या शाळेतील तत्कालीन कनिष्ठ लिपिक सुधाकर मधुकरराव शेळके यांना नोकरीमधून कमी करण्याच्या आदेशा विरुद्ध शाळा न्यायाधीकरण लातूर येथे अपील दाखल केले होते. सदरील अपिलाचा निकाल 04/02/2025 रोजी न्यायाधीकरण लातूर यांनी दिला व संबंधित कनिष्ठ लिपिक सुधाकर मधुकर शेळके यांना नोकरी मध्ये पूर्ववत रजू करून घेण्याचे आदेश दिले होते. सदरील आदेशा विरुद्ध संस्थेचे सचिव व मुख्याध्यापक यांनी मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठांमध्ये याचिका क्रमांक 3939/2025 दाखल केली होती. सदरील याचिकेमध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद बीड यांना देखील प्रतिवादी करण्यात आले होते. सदरील याचिकेची सुनावणी दिनांक 27/03/2025 रोजी झाली असता मा. उच्च न्यायालयाने शाळा न्यायाधिकरण्याच्या आदेशास स्थगिती दिली होती.  सदरील स्थगिती आज पर्यंत चालू आहे. सदरील आदेशाची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद बीड यांना दिलेली होती. असे असताना देखील शिक्षणाधिकारी यांनी सुधाकर शेळके यांच्या अर्जावरून संस्थेस व शाळेस नोटीस काढून शाळा न्यायाधीकरणाचे आदेश पालन करण्यासंबंधी सुनावणीची नोटीस दिली. सदरील सुनावणी मध्ये देखील संस्थेचे सचिव व हेडमास्तर यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रियाराणी पाटील यांना मा. उच्च न्यायालयाच्या दिनांक 27/03/2025 रोजी याचिका क्र. 3939/2025 मध्ये शाळा न्यायाधिकरणाच्या आदेशास स्थगिती दिलेली असल्यामुळे  शेळके यांना जॉईन करून घेता येणार नाही असे निदर्शनास आणून दिले होते. असे असताना देखील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी दिनांक 17/08/2025 रोजी सुधाकर मधुकर शेळके यांना तत्काळ रजू करून घ्यावे असे आदेश संस्थेस दिले. मा. उच्च न्यायालयाने शाळा न्यायधीकरणाच्या  आदेशास स्थगिती दिली असताना देखील व त्याचे ज्ञान प्रियाराणी पाटील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद बीड यांना असतांना देखील हेतू परस्पर मा. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याच्या उद्देशाने कर्मचार्‍यास रजू करून घेण्याचे आदेश काढले व न्यायालयाचा अवमान केला. म्हणून संस्थेचे सचिव भारती विशाल पाटील व हेडमास्तर विशाल पाटील यांनी मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद मध्ये अवमान याचिका क्रमांक 281/2026 दाखल केली व सदरील याचिकेची सुनावणी दिनांक 04/05/2026 रोजी मा. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण आर. पेडणेकर यांच्या पुढे झाली असता न्यायालयाने प्रतिवादी प्रियाराणी पाटील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद बीड व सुधाकर मधुकर शेळके यांना नोटीस काढून याचिकेची पुढील सुनावणी दिनांक 15/06/2026 रोजी ठेवली आहे. याचीका कर्त्याच्या वतीने ड. नरसिंह एल.जाधव यांनी काम पाहिले.

COMMENTS