‘जनगणना से जन कल्याण’ म्हणजेच जनगणनेतून जन कल्याण. अचूक आकडेवारीमुळे शासकीय योजनांसह वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण यांसारख्या क्षेत्रांचे नियोजन कर

‘जनगणना से जन कल्याण’ म्हणजेच जनगणनेतून जन कल्याण. अचूक आकडेवारीमुळे शासकीय योजनांसह वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण यांसारख्या क्षेत्रांचे नियोजन करता येते. सरकारी योजनांचा योग्य लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यास मदत होते. त्यामुळे जनगणना आवश्यक आहे. मी स्वत: जनगणनेत सहभागी होऊन स्व माहिती भरली आहे. आपणही जनगणनेत सहभागी व्हावे असे आवाहन बीडच्या नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांनी केले आहे. प्रत्येक नागरीकाने जनगणनेत सहभागी होऊन माहिती संकलनासाठी येणार्या प्रत्येक कर्मचार्यास सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
बीड शहरासह जिल्हाभरात जनगणना सुरू आहे. भारताची ही 16 वी आणि स्वातंत्र्यानंतरही 8 वी जनगणना आहे. ही पहिली डिजीटल जनगणना असून गणक कर्मचारी मोबाईल अॅपद्वारे माहिती संकलित करत आहेत. नागरीकांसाठी स्वत: माहिती भरण्याची सुविधा प्रथमच उपलब्ध करून देण्यात आली आहे. (….) या पोर्टलवर नागरीकांनी स्वत:च्या घराची माहिती भरावी. दोन टप्यात होणार्या जनगणनेत पहिला टप्पा घरांची यादी आणि गृह जनगणना आणि दुसरा टप्पा लोकसंख्या गणना असा आहे. जनगणनेतून सर्व माहिती संकलित करण्यात येत आहे. ही माहिती सरकारी योजना राबवण्यास अत्यंत महत्वाची आहे. त्या अनुषंगाने बीड शहरातील प्रत्येक नागरीकाने जनगणना प्रक्रियेत सहभागी व्हावे. संबंधित पोर्टलवर (पा……) याची माहिती भरावी आणि त्यानंतर घरी येणार्या गणकास याची माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांनी केले आहे.

COMMENTS