Homeताज्या बातम्याबीड

वक्फ मंडळात तोंड बघून कामे केली जात आहेत का? महत्त्वाच्या प्रकरणांकडे दुर्लक्षदहा दिवसांत मंडळ बरखास्त करा, अन्यथा जनआंदोलन-शेख नदीम

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाविरोधात राज्यभरात नाराजीचा सूर वाढताना दिसत आहे. ठराविक मुद्द्यांवरच काम करून महत्त्वाच्या प्रकरणांकडे दुर्लक्ष केले ज

उष्माघातापासून सावध राहा ; नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी -जिल्हाधिकारी
महावितरणच्या काळे इंजिनिअरचा माज शेतकर्‍यांच्या जीवावरखरात आडगावात वीजेचा तमाशा सुरू!
पत्रकार संघाचे संस्थापक संजय भोकरे यांना झेड प्लस सुरक्षा देवून हत्येच्या कटामागील मुख्य सूत्रधार शोधा – वैभव स्वामी



महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाविरोधात राज्यभरात नाराजीचा सूर वाढताना दिसत आहे. ठराविक मुद्द्यांवरच काम करून महत्त्वाच्या प्रकरणांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप समाजसेवक शेख नदीम यांनी केला आहे. तसेच, दहा दिवसांच्या आत मंडळ बरखास्त करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
शेख नदीम यांनी आरोप केला आहे की, क्लोज फॉर ऑर्डर म्हणून वर्गीकृत करण्यात आलेली अनेक प्रकरणे महिनोनमहिने प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. या प्रकरणांमध्ये कोणतीही ठोस कार्यवाही होत नसताना काही निवडक आणि कमी महत्त्वाच्या विषयांवर मात्र तातडीने निर्णय घेतले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते, चार सदस्यीय मंडळ मनमानी पद्धतीने कारभार करत असून त्यामुळे मंडळाची प्रतिमा मलिन होत आहे. या प्रकरणात संबंधितांवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शेख नदीम यांनी आपल्या पत्रकात असा आरोप केला आहे की, मंडळ जाणूनबुजून भू-माफियांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय देण्याचे काम करत आहे. राज्यातील काही भूमाफिया मंडळातील पदाधिकार्‍यांसोबत विविध छायाचित्रांमध्ये दिसून आल्याने मंडळ भूमाफियांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा संशय निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले. बीड जिल्ह्यातील समनापूर आणि संगीन मस्जिद घोटाळा प्रकरणात अद्याप ठोस कारवाई का करण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, बीड जिल्हा कार्यालयाचे स्थलांतर अशा ठिकाणी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला, जिथे संबंधित कर्मचार्‍यांचे वैयक्तिक संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शहराशी सुलभ संपर्क असलेल्या ठिकाणाऐवजी अन्य ठिकाणाची निवड का करण्यात आली, याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. वक्फ मंडळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप करत, लवकरच संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड केला जाईल, असा इशाराही शेख नदीम यांनी दिला आहे. राज्य शासनाला थेट आव्हान देत त्यांनी म्हटले आहे की, दहा दिवसांच्या आत मंडळ बरखास्त करून केंद्र सरकारच्या नियमांनुसार नवीन मंडळाची नियुक्ती करण्यात यावी. अन्यथा मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासन कोणती भूमिका घेते, आरोपांची सत्यता तपासून योग्य ती कारवाई होते का, की हे प्रकरण आणखी चिघळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS