Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड शहरात अवैध बॅनर कोसळल्यामुळे युवक जखमी; जखमी युवकाचा महापालिकेला सवाल

नांदेड : नांदेड शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अवैध बॅनरबाजीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, आयटीआय कॉर्नर परिसरात घडलेल्य

काळजाचा ठोका चुकवणारी घटना! नांदेडमध्ये खेळता खेळता ४ मुलं पाण्यात बुडाली
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! जुन्नरमध्ये खेळता खेळता दोन चिमुकले शेततळ्यात कोसळले
धाराशिवमध्ये सुट्टीत आलेल्या विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू

नांदेड : नांदेड शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अवैध बॅनरबाजीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, आयटीआय कॉर्नर परिसरात घडलेल्या घटनेने महापालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रस्त्यावर लावण्यात आलेला एक मोठा बॅनर अचानक कोसळून अमोल उंब्रजकर या युवकाच्या डोक्यावर पडल्याने तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर अवैध बॅनरबाजी कधी थांबणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल उंब्रजकर हे आयटीआय कॉर्नर परिसरातून पायी जात असताना रस्त्यालगत उभारण्यात आलेला लोखंडी फ्रेमचा बॅनर अचानक कोसळला. बॅनर थेट त्यांच्या डोक्यावर पडल्याने ते रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळले. परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांना खासगी दवाखान्यात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले असले तरी या घटनेमुळे शहरातील अवैध बॅनरबाजीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात विविध राजकीय, सामाजिक, वाढदिवस, सत्कार व शुभेच्छांचे हजारो बॅनर्स कोणतीही अधिकृत परवानगी न घेता लावले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. चौक, मुख्य रस्ते, गल्लीबोळ, विद्युत खांब, झाडे आणि सार्वजनिक ठिकाणी मनमानी पद्धतीने बॅनर उभारले जात आहेत. विशेष म्हणजे, महापालिकेकडून या प्रकारांवर प्रभावी कारवाई होत नसल्याने बॅनर लावणार्‍यांचे मनोबल वाढत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. या घटनेनंतर आणखी एक गंभीर प्रश्न समोर आला आहे. संबंधित बॅनर नेमका कोणी लावला होता, याची माहिती महापालिकेकडे नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणात जबाबदार कोण, दंड कोणाला आकारायचा आणि जखमी युवकाच्या उपचाराचा खर्च कोण उचलणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नागरिकांच्या मते, महापालिकेने अवैध बॅनरबाजीविरोधात विशेष मोहीम राबवून कठोर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात अशा घटनांमध्ये मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहर सौंदर्यीकरण आणि नागरिकांची सुरक्षितता यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.

COMMENTS