Homeताज्या बातम्याबीड

जमिनीच्या वादातून उमापूरमध्ये शेतकर्‍याचे कडबा गांजी व टायर जाळले; वाहनांची तोडफोड, लाखोंचे नुकसानचकलंबा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल; अ‍ॅट्रॉसिटीची धमकी दिल्याचा आरोपकारवाई न झाल्यास सोमवारी शेख कुटुंबीयांचा आत्मदहनाचा इशारा

गेवराई तालुक्यातील उमापूर येथे जमिनीच्या वादातून एका शेतकर्‍याच्या कडबा गांजीसह टायर जाळून तसेच हायवा, जेसीबी व स्कार्पिओ वाहनांची तोडफोड करून ला

आदित्य महाविद्यालयात रुग्णांच्या प्रत्यक्ष सेवेचे मूल्यमापन कार्यशाळाविद्यार्थ्यांच्या क्लीनिकल व व्यावसायिक कौशल्य विकासासाठी 6 तास विशेष प्रशिक्षण.
शिवमय वातावरणात बीडमध्ये धर्मवीर संभाजी महाराज जयंती साजरी
नागरिकांनी जनगणना स्वतः करून घ्यावी-ब्राईट सोशल फाउंडेशनचे आवाहन



गेवराई तालुक्यातील उमापूर येथे जमिनीच्या वादातून एका शेतकर्‍याच्या कडबा गांजीसह टायर जाळून तसेच हायवा, जेसीबी व स्कार्पिओ वाहनांची तोडफोड करून लाखो रुपयांचे नुकसान केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी चकलंबा पोलीस ठाण्यात गणेश कापसे, राणी कापसे, आशाबाई वालेकर व गीता वालेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमापूर येथील शेतकरी शेख अहमद शेख मोहम्मद हे 7 मे रोजी जमीन वादासंदर्भात तक्रार देण्यासाठी चकलंबा पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी त्यांच्या हायवा चालकाने फोन करून काही व्यक्तींनी शेतातील कडबा गांजी व नवीन-जुने टायर पेटवून दिल्याची माहिती दिली. तसेच शेतात उभ्या असलेल्या जेसीबी, हायवा आणि स्कार्पिओ वाहनांच्या काचा दगड मारून फोडण्यात आल्याचेही सांगितले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या महिलांना शिवीगाळ करून शेतात येऊ नका, अन्यथा जीवे मारू तसेच अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेत शेख अहमद यांचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी चकलंबा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (इछड) अंतर्गत कलम 115(2), 352, 351(2), 351(3), 324(4) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शेख कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, संबंधित व्यक्तींकडून सातत्याने मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास दिला जात असून खोटे अ‍ॅट्रॉसिटी गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. संबंधित आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करून संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे केली आहे.
कारवाई न झाल्यास आत्मदहन
दरम्यान, दोन दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर संपूर्ण शेख कुटुंब आत्मदहन करेल, असा इशारा कुटुंबीयांनी दिला आहे. या प्रकरणामुळे उमापूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने आरोपींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

COMMENTS