Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंगोलीगेट फुल मार्केटमध्ये दुर्गंधीयुक्त कचर्‍याचे साम्राज्य; फुलविक्रेत्यांचा महापालिकेविरोधात संताप

नांदेड : नांदेड शहरातील हिंगोली गेटखाली भरत असलेल्या फुल मार्केटमध्ये सध्या दुर्गंधीयुक्त कचर्‍याचे साम्राज्य निर्माण झाले असून, फुलविक्रेते आणि

अवघ्या दोनशेच्या स्टॅम्पवर व्यावसायिक वीज कनेक्शन; शेतकऱ्यांना मात्र महिनोन्‌महिने प्रतीक्षा; कोपरगावात महावितरणच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
ओढे-नाले साफसफाईची महापालिकेकडून निव्वळ धुळफेक
जालापूरमध्ये नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहावर अतिक्रमण; गायरान जमिनीत अडथळा करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचे आदेश

नांदेड :
नांदेड शहरातील हिंगोली गेटखाली भरत असलेल्या फुल मार्केटमध्ये सध्या दुर्गंधीयुक्त कचर्‍याचे साम्राज्य निर्माण झाले असून, फुलविक्रेते आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. व्यापार्‍यांकडून टाकण्यात येणारी उरलेली फुले, प्लास्टिक पिशव्या आणि इतर कचरा अनेक दिवस जागेवरच सडत पडत असल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे.
विशेष म्हणजे या अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त वातावरणात अनेक वयोवृद्ध महिला दररोज फुले विक्रीसाठी बसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सततच्या दुर्गंधीमुळे आणि घाणीमुळे त्यांना श्वसनाचे विकार तसेच इतर आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याची तक्रार फुलविक्रेत्यांनी केली आहे. फुलविक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, महानगरपालिकेकडून साफसफाईच्या नावाखाली प्रत्येक विक्रेत्याकडून दररोज 30 रुपये शुल्क आकारले जाते. महिन्याला जवळपास 900 रुपये देऊनही या ठिकाणी नियमित साफसफाई होत नसल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला आहे. कर घेतला जातो, मात्र सुविधा मिळत नाहीत, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. मोठे व्यापारी त्यांच्या दुकानातील उरलेली फुले आणि कचरा थेट रस्त्यावर टाकत असल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे. परिणामी संपूर्ण परिसरात घाणीचे ढीग साचले असून, माशा आणि डासांचे प्रमाणही वाढले आहे. याशिवाय, फुल मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणावर ऑटो रिक्षा आणि इतर वाहने उभी केली जात असल्याने ग्राहकांना आणि फुलविक्रेत्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे व्यवसायावरही परिणाम होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. महानगरपालिकेने तातडीने या परिसराची नियमित साफसफाई करावी, कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावावी आणि अतिक्रमणासह वाहनांच्या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी मागणी फुलविक्रेत्यांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS